शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

निकालाने ढवळून निघाले ग्रामीण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:31 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. या निवडणुकीत अनेक नवखे उमेदवार विजयी झाले आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायतींचे निकाल : एटापल्ली तालुक्यात ३२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध; निकालानंतर केला जल्लोष

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. या निवडणुकीत अनेक नवखे उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली शक्ती पणाला लावली होती. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.एटापल्ली - हालेवारा ग्रामपंचायतीत राकाँचे वासुदेव गेडाम हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये आविसंचे वर्चस्व राहिले आहे. सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. आविसंचे उमेदवार नरेश मडावी यांचा वासुदेव गेडाम यांनी १२० मतांनी पराभव केला. विद्यमान सरपंच मोहन मट्टामी यांना केवळ ७० मते मिळाली. बीजीपीचे उमेदवार नितेश मट्टामी यांना १९१ मते मिळाली. ६० मतदारांनी नोटाचा वापर केला. ११ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आविसंचे सात, राकाँचे तीन व भाजपाचा एक सदस्य विजयी झाला. विजयी सदस्यांमध्ये चमरू उसेंडी, नरेश मडावी, वच्छला हलामी, महेश नरोटे, प्रियंका नरोटे, रितू किरंगा, मंदा तलाडे, ज्योती मट्टामी, रूपसाय गोटा, वैशाली नरोटी, नीला गोटा यांचा समावेश आहे. तोडसा ग्रामपंचायतीमध्ये दोन जागेकरिता पोटनिवडणूक झाली. याठिकाणी आविसंचे नानेश गावडे, मुन्नी दुर्वा हे उमेदवार विजयी झाले.एटापल्ली तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ३२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जारावंडी येथे लक्ष्मी योगेश कुमरे, कांदोळी येथे सुशिला महारू आत्राम, गट्टा येथे दिनेश मुंशी लेकामी, सन्नी दानू गोटा, विनोद महारू लेकामी, महारू मांगे लेकामी, मिरवा बिच्चू लेकामी, पूनम कोमटी लेकामी, कसनसूर येथे जयाबाई मासू पुडो, नागुलवाडी येथे रंजू विलास गावडे, सुनीता विजा तिम्मा, श्यामराव सैनू गावडे, सविता सदू दुर्वा, पुरसलगोंदी येथे सुशिला बाजीराव सडमेक, निता मासू पुंगाटी, वैशाली बारीकराव सडमेक, साईनाथ दल्लू दोरपेटी, बाली लुला वेडदा, सुनंदा दसरू वेडदा, राजू भीमा नरोटी, गीता लुला वेडदा, राधा राजू वेडदा, चुंडू राजू दोरपेटी, लक्ष्मण चैतू जेट्टी, तारा दोहे होळी, चोखेवाडा येथे लालसू मनकू नरोटे, माया मंगू नरोटे, गीता तुळशिराम उसेंडी, बाजीराव मनकू नरोटे, रजनी सैनू उसेंडी, बाबुराव मानू कोल्हा, संगीता झुलसू पोटावी यांचा समावेश आहे.मुलचेरा - तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व स्थापित केले असून वासुदेव विष्णुदास भोयर यांचा ३४ मतांनी पराभव करत अक्षय चुधरी विजयी झाले आहेत. अक्षय चुधरी यांना ३१५ मते तर वासुदेव भोयर यांना २८१ मते मिळाली.अहेरी - राजाराम ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून विनायक सुरेश आलाम हे निवडून आले आहेत. त्यांना एकूण ५५९ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नागेश किष्टा कन्नाके यांना ३४५, वसंत हनुमंतू सिडाम यांना १०१ मते मिळाली. प्रभाग क्र. २ मध्ये सतीश मुत्ता सडमेक हे विजयी झाले. व्यंकटरावपेठा येथील प्रभाग क्र. ३ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत किशोर लक्ष्मण करमे हे विजयी झाले. त्यांना २३० मते मिळाली. प्रभाग क्र. ३ ब मधून अनिता विनायक आलाम या विजयी झाल्या. प्रभाग क्र. १ अ मधून सत्यवान भगवान आलाम हे विजयी झाले. त्यांना २१२ मते मिळाली. प्रभाग क्र. ३ अ मधून आनंदराव लसमा वेलादी यांना १३२ मते मिळाली. ते विजयी झाले. प्रभाग क्र. २ अ मध्ये सुरक्षा हनुमंतू आकदार हे विजयी झाले. प्रभाग क्र. १ मधून शारदा विनोद आलाम व पुष्पा मलय्या तौरेम हे विजयी झाले. प्रभाग क्र. ३ अ मधून नारायण तोेगुलय्या कंबगौणीवार हे विजयी झाले. त्यांना १३९ मते मिळाली. प्रभाग क्र. २ क मधून सपना प्रफुल मारकवार या विजयी झाल्या. त्यांना १३६ मते मिळाली.इंदाराम ग्रामपंचायतीत प्रभाग क्र. ३ मध्ये तिरूपती बाजीराव मडावी हे विजयी झाले. जिमलगट्टा येथील प्रभाग क्र. ३ मध्ये आशा किशोर पानेमवार या विजयी झाल्या. त्यांना २४५ मते मिळाली. खमनचेरू ग्रामपंचायतीत पानम शंकर गेडाम हे विजयी झाले. त्यांना १६४ मते मिळाली.तळोधी (मो.) - तळोधी येथील वॉर्ड क्र. २ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस होता. मात्र मतभेद निर्माण झाल्याने निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत जितेंद्र रामदास कुनघाडकर यांना २१५ मते मिळाली ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुदाम किरमे यांना १७० मते मिळाली. तर खुशाल कुनघाडकर यांना केवळ २५ मते मिळाली. विजयी उमेदवार सरपंच माधुरी अतुल सुरजागडे यांच्या गटाचा आहे. विजयानंतर जल्लोष करण्यात आला.आष्टी - चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील पोटनिवडणुकीत श्रीरंग शेंडे हे विजयी झाले. शेंडे यांना २७५ मते मिळाली. तर संजय मंडरे यांना २४१ मते मिळाली. या निवडणुकीत पंदिलवार गटाचा उमेदवार पराभूत झाला.चामोर्शी - वायगाव ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्र. २ मध्ये आनंदाराव गणपती कोडापे हे उमेदवार विजयी झाले. त्यांना ३१६ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार साईनाथ कवडू कुळमेथे यांना २३१ मते मिळाली. मार्र्कंडा (कं.) येथील प्रभाग क्र. १ मध्ये तुकाराम लचमाजी तोरे हे निवडून आले. त्यांना १४३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भगिरथ गुलाम शेडमाके यांना १२६ मते मिळाली. घारगाव येथे भाग्यश्री लोमेश आभारे यांची अविरोध निवड करण्यात आली. भाडभिडी येथे चेताराम विठोबा भुरसे, चापलवाडा येथे गयाबाई सुरेश राजुलवार, जामगिरी येथे बंडू हरीदास देवतळे, पांडुरंग मंगरू वाढई, अरूण चंदू तलांडे, वरूर येथे महेंद्र मारोती आलाम, सुदाबाई जानकीराम आत्राम, विमल प्रभाकर कुमरे हे अविरोध निवडून आले आहेत.कुरखेडा - तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीत चार सदस्य पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये अरूण ताराम व तुळजाबाई होळीकर यांचा समावेश आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये एकूण ५३२ मतदार आहेत. त्यापैकी ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. खुल्या प्रवर्गाकरिता असलेल्या या जागेवर सुनील सोनटक्के यांनी २०३ मते घेत विजयी मिळविला. तर वॉर्ड क्र. २ मध्ये ५०३ पैकी ३८७ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला. खुल्या प्रवर्गात चौरंगी लढत झाली. यामध्ये अनिल मच्छीरके यांना १२९ मते मिळाली. ते विजयी झाले. निकालाचे घोषणा होताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, पं.स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज तितराम, जि.प. सदस्य प्रल्हाद कराडे, प्रभाकर तुलावी, अ‍ॅड. ईश्वर दाऊदसरीया, पुरूषोत्तम धांडे, रवी सोनटक्के, मन्नालाल मोहारे, श्यामराव कुमरे, बालू नाकतोडे, मणिराम मडावी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.सिरोंचा - कोटपल्ली येथे सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सुरेश व्यंकटी मडावी, रणजिता स्वामी नाईन, सौजन्या चंदू कोलमपल्ली, मल्लेश बकय्या चिकनम, उमादेवी सुरेश डुरके, सुरेश व्यंकटी मडावी, राजेश शंकर येंबरी हे उमेदवार निवडून आले. जाफ्राबाद येथे नरसय्या नानय्या पोरतेट, अंकिसा माल येथे शारदा चंद्रमन वंगपल्ली, दशावतारालू पोचमकोंडी, आसरअल्लीत वैशाली दामोदर सिडाम, बेजुरपल्लीत हिपो कारे मडे, गुलमकोंडात जलमय्या नरसय्या कुरसम, कोपेलात सगुणा चंद्रया काका, तुमनूर येथे बकम्मा मदनया सिडेम, चिंतरवेलात रमेश गणेश कंडेला हे विजयी झाले. विजयानंतर जल्लोष साजरा केला.

टॅग्स :Electionनिवडणूक