शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

आरटीओ कॅम्पकडे धाव

By admin | Updated: December 16, 2014 22:53 IST

वाहन चालविण्याच्या परवान्याकरीता आॅनलाईन प्रक्रिया अवलंबिली जात आहे़ जिल्हा आरटीओ कार्यालयात आॅनलाईन परीक्षा घेतली जाते़ मात्र इतर शहरात होणाऱ्या आरटीओ

वाहन परवाना प्राप्तीकरिता : रात्री उशिरापर्यंत लागली होती रांगदेसाईगंज : वाहन चालविण्याच्या परवान्याकरीता आॅनलाईन प्रक्रिया अवलंबिली जात आहे़ जिल्हा आरटीओ कार्यालयात आॅनलाईन परीक्षा घेतली जाते़ मात्र इतर शहरात होणाऱ्या आरटीओ कॅम्पमध्ये परीक्षा न घेता परवाना दिल्या जात असल्याने कॅम्प असलेल्या ठिकाणी परवाना प्राप्त करून घेणाऱ्यांनी गर्दी केली आहे़ आॅनलाईन परीक्षेपासून वाहनधारकांना दूर ठेवणारे दलाल मात्र यातून मर्जीची रक्कम उकळत असल्याचे दिसून येते.वाहन परवाना घेण्यासाठी दलालामार्फत मनमर्जीची रक्कम घेतली जात होती़ यामुळे सर्वसामान्य नागरिकांची परवड होत होती़ त्यातुन अधिकारी व दलाल यांच्या कचाटयातून सर्वसामान्यांना दूर करण्यासाठी शासनाने आॅनलाईन परीक्षा प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू केली. जिल्ह्यात केवळ गडचिरोली येथे वाहन चालविण्याच्या परवाना घेण्यासाठी आॅनलाईन प्रक्रियेतून जावे लागते़ मात्र जिल्हास्थळा व्यतिरीक्त इतर ठिकाणी होणाऱ्या आरटीओ कॅम्प मध्ये परंपरागतरित्याच परवाना प्राप्ती दिली जात आहे़ यामुळे जिल्हा ठिकाणी जाऊन परवाना घेण्यापेक्षा कॅम्प असलेल्या ठिकाणी दलालांनी गर्दी केली आहे़ आॅनलाईन परवाना प्राप्तीची परीक्षा कठिण नसली तरी दलालामार्फत परिक्षेसंबंधी सभ्रम पसरविला जात आहे़ कित्येक वाहन चालकांना वाहतूकीच्या सर्वसाधारण नियमाची सुध्दा ओळख नसते़ कित्येकांना तर साधे वाहन देखील चालविता येत नाही़ मात्र दलाला मार्फत त्यांना परवाना प्राप्त करून दिल्या जाते़ सोमवारला स्थानिक विश्रामगृहात आरटीओ कार्यालयाच्यावतीने परवाना बाबतचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. नेहमी सुरळीतपणे आरटीओ परवान्याची देवान घेवान होत असतांना सोमवारला मात्र परवाना प्राप्त करून घेणाऱ्याची शहरात एकच गर्दी उसळली होती़ चामोर्शी, मुलचेरा, गडचिरोली, धानोरा येथील युवकांनी परवाना प्राप्तीसाठी शहरात होत असलेल्या शिबिरात हजेरी लावली होती़ जिल्हा ठिकाणावरील डॉयव्हींग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा या शिबीरात परवाना प्राप्त करण्यासाठी रांग लावली होती़ प्रत्येक महिण्यात साधारणत: ९० परवाने देऊन सध्याकाळी विश्राम गृहात शुकशुकाट दिसतो़ मात्र सोमवारला झालेल्या शिबीरात परवाना प्राप्ती करिता नागरिकांना रात्र पर्यंत रांगेतच राहावे लागले़ वाहनचालकांना परवाना प्राप्ती घेणे सोयीचे व्हावे, याकरिता उपप्रादेशिक कार्यालयामार्फत दोन तालुक्यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात यावे, जेणेकरून या शिबिरात वाहनचालकांची झुंबळ उडणार नाही व शिबिरात येणाऱ्या सर्वच वाहनचालकांना परवाना प्राप्ती सहज मिळेल. (वार्ताहर)वाहन परवाना शिबिरात दलालांची मनमानी गडचिरोली येथील आरटीओ कार्यालय अजूनही दलालांच्या विळख्यात आहे़ दलाल व अधिकारी यांच्या संगनमताने केवळ कोरची, आरमोरी, देसाईगंज व कुरखेडा येथील नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या शिबिरात बाहेरील तालुक्यातील नागरिकाचे परवाने दिल्या गेले असल्याने नागरिकांनी ओरड केली आहे. कित्येक तासापासून रांगेत ताटकळत असतांना काही दलाल रांगेच्या मध्येच आपले उमेदवार टाकत असल्याची देखील नागरीकांनी ओरड केली आहे़ या प्रकाराची गंभीर दखल घेऊन उपप्रादेशिक कार्यालयाने दलालांवर कारवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी सुज्ञ वाहनचालकांनी केली आहे.