शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांचे 134 काेटी रुपये वीजबिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

ठळक मुद्देमहावितरण अडचणीत : जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी १६ महिन्यांपासूनचे वीजबिल भरलेच नाही

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गावातील पथदिव्यांचे सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपयांचे वीजबिल थकले असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. घरगुती ग्राहकांकडेही सुमारे १५ काेटी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या ग्राहकांना वीजबिलाचा पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणमार्फत दिला जात आहे. दरवर्षी गावांमधील पथदिव्यांचे वीजबिल शासनामार्फत भरले जात हाेते. ग्रामपंचायती पंचायत समितीकडे वीजबिल सादर करीत हाेते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत शासनाकडे वीजबिल पाठविले जात हाेते. शासनाकडूनच वीजबिल भरले जात असल्याने पथदिव्यांच्या वीजबिलाचा त्रास ग्रामपंचायतीला राहत नव्हता. मात्र या वर्षी मे महिन्यात राज्य शासनाने एक परिपत्रक जाहीर केले. त्यात वीजबिलाचा भरणा ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून करावा, असे निर्देश दिले. मात्र काही ग्रामपंचायतींचा १५व्या वित्त आयाेगाच्या निधीपेक्षाही पथदिव्यांच्या वीजबिलाची रक्कम अधिक आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल भरले नाही. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे १२ महिने व जुलैपर्यंतचे चार महिने असे एकूण १६ महिन्यांचे बील थकले आहे.  बिलाची रक्कम सुमारे १३४ काेटी ३१ लाख रुपये एवढी आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरूज्या घरगुती, व्यावसायिक, औद्याेगिक ग्राहकांनी मागील तीन ते चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा केला नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्रामपंचायतींचाही वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

शासनाने मागितली पथदिव्यांची बिलेराज्य शासनाने मे महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे वीजबिल १५व्या वित्त आयाेगाच्या निधीतून भरायचे हाेते. मात्र काही ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयाेगातून मिळणाऱ्या अनुदानापेक्षाही वीजबिलाची रक्कम अधिक हाेती. तसेच संपूर्ण रक्कम वीजबिलावरच खर्च झाल्यास उर्वरित कामांसाठी ग्रामपंचायतीकडे अनुदानच राहणार नाही, ही बाब शासनाच्या लक्षात आली. शासनाने पुन्हा पंचायत समितींमार्फत वीजबिले मागण्यास सुरुवात केली. 

घरगुती ग्राहकांकडे १५ काेटी थकले- गडचिराेली जिल्ह्यात २ लाख ६ हजार ७७३ घरगुती वीजग्राहक आहेत. या ग्राहकांकडून महिन्याला जवळपास १३ काेटी रुपयांची वीज खर्च केली जाते. काेराेनाच्या कालावधीत काही नागरिकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. सुमारे १४ काेटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल या ग्राहकांकडे थकले आहे. - व्यावसायिक ग्राहकांकडे २ काेटी ५० लाख, औद्याेगिक ग्राहकांकडे २ काेटी २९ लाख, सार्वजनिक सेवेच्या ग्राहकांकडे ३ काेटी ८७ लाख रुपयांची रक्कम थकली आहे. सर्व मिळून जवळपास २५ काेटी रुपयांची रक्कम थकली असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज