शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ज्या खोलीत शिक्षण, तेथेच निवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:37 IST

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या टोकावरील सिरोंचा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आश्रमशाळा आहे.

ठळक मुद्देसिरोंचातील शासकीय आश्रमशाळा : बसण्यासाठी डेस्क-बेंच नाही, शिक्षकांसाठी निवासस्थाने नाही

नागभुषणम चकिनारपुवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या टोकावरील सिरोंचा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आश्रमशाळा आहे. पण शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी सुविधाच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. अशा परिस्थितीत विविध सोयीसुविधांसाठी शासनाकडून दिला जाणारा निधी कुठे गायब होतो? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सिरोंचा येथील आश्रमशाळेत एकूण १९५ विद्यार्थी पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. कालेश्वरकडे जाणाºया मार्गावर दोन मजली प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे सदर इमारत या मार्गावरून ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेते. दुरून बघितले तर एखाद्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीप्रमाणे सदर इमारत दिसत असून या इमारतीत सर्वच सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात, असा अंदाज येतो. मात्र हा अंदाज प्रत्यक्ष इमारतीत गेल्यानंतर चुकीचा ठरतो. लोकमत प्रतिनिधीने सदर या आश्रमशाळेला भेट देऊन वर्ग, स्वयंपाक गृह व परिसराची पाहणी केली असता, या ठिकाणी सोयीसुविधांचा मोठा अभाव असल्याचे दिसून येते.शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक असलेल्या सोयीसुविधा येथील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिसून आले. दुर्गम भागातून आलेले आदिवासी विद्यार्थी असुरक्षित वातावरणात याच वसतिगृहात राहून आश्रमशाळेत शिक्षण घेत असल्याचे दिसून येते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवासासाठी स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. मात्र निवासासाठी स्वतंत्र खोली नसल्याने दिवसभर अध्ययन व रात्री त्याच खोलीमध्ये झोपावे लागत असल्याची भयावह वास्तव दिसून येते. विद्यार्थ्यांना डेस्क व बेंच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवर बसून दिवसा शिक्षण घ्यावे लागते. तर झोपण्यासाठी बेड नसल्याने त्याच खोलीत फरशीवर झोपावे लागत आहे. या ठिकाणी एकच हातपंप आहे. आंघोळीसाठी पाणी आणण्यासाठी व जेवन झाल्यानंतर ताट धुण्यासाठी या हातपंपावर गर्दी उसळते. आश्रमशाळेचे शिक्षक निवासी राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे बहुतांश आश्रमशाळांमध्ये शिक्षकांसाठी निवासस्थाने आहेत. मात्र सिरोंचा येथील आश्रमशाळेत शिक्षकांसाठी निवासस्थाने नाहीत. येथील शिक्षकांना सिरोंचा येथे भाड्याच्या खोलीत राहावे लागते. परिणामी ते रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही.संरक्षण भिंतीचा अभावसिरोंचा येथील शासकीय आश्रमशाळा कालेश्वर मुख्य मार्गावर आहे. आश्रमशाळा सिरोंचापासून काही दूर अंतरावर आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आश्रमशाळेला संरक्षण भिंत असणे आवश्यक आहे. मात्र येथील आश्रमशाळेला संरक्षण भिंतच नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आहे. मात्र याकडे आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष होत आहे. आश्रमशाळेच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधण्याची मागणी अनेक वेळा सिरोंचा येथील राजकीय पदाधिकाºयांनी केली आहे. मात्र अजूनपर्यंत संरक्षण भिंतीसाठी मंजुरी मिळाली नाही.टिनाच्या खोलीत स्वयंपाक घरआश्रमशाळेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचे जेवन तयार केले जाते. सकाळचा नास्ता, दुपारचे व रात्रीचे जेवन तयार केले जात असल्याने स्वयंपाक गृहात रात्रंदिवस काम चालते. त्यामुळे स्वतंत्र स्वयंपाक गृह असणे आवश्यक आहे. मात्र येथे स्वयंपाक गृहासाठी स्वतंत्र खोली नाही. वरून टीन टाकून तात्पुरती खोली तयार केली आहे. पावसाळ्यात पावसाचे फवारे येतात तर उन्हाळ्यात टीन प्रचंड गरम होते.