शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बसेसच्या छताला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:19 IST

शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. नागरिकांना सिटवर छत्री घेऊन बसावे लागते.

ठळक मुद्देअहेरी आगाराचे दुर्लक्ष : प्रवाशांना छत्री उघडून बसावे लागते आसनांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : शहरी भागासह ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली बससेवा भंगार अवस्थेमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. अहेरी बस आगारातील अनेक बसेस भंगार झाल्याने पाऊस सुरू असताना त्या गळतात. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. नागरिकांना सिटवर छत्री घेऊन बसावे लागते.अहेरी उपविभागात जोरदार पाऊस सुरू आहे. परंतु दररोज कर्तव्यावर अथवा कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना बसमधून प्रवास करावा लागतो. सध्या अहेरी आगाराच्या अनेक बसेसची दुरवस्था झाली आहे. परंतु या बसेसची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. अनेक बसेसच्या छतातून पाणी गळत असल्याने प्रवाशांना एकतर उभे राहावे लागते किंवा बसमध्ये छत्री उघडी करून बसावे लागते. प्रवासी बसमधून प्रवास करीत असतांना आवश्यक प्रवासभाडे देऊनही त्यांना योग्य सोयी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.कपडे व साहित्य भिजतातएटापल्ली, सिरोंचा व भामरागड सारख्या दुर्गम भागात सोडण्यात येणाºया बसेसच्या छतातून पाणी गळते. पाणी आसनांवर पडून ती ओली होतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश, पुस्तके भिजतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आगाराने बसच्या छतांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. परंतु दुर्लक्षच झाले.