शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोची १२ लाखांची मजुरी थकीत

By admin | Updated: August 27, 2015 01:38 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणात १२ ही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत.

तीन महिने उलटले : ८७५ मजुरांवर उपासमारीची पाळीलोकमत विशेषगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रणात १२ ही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ८७५ रोहयो मजुरांची जवळपास १२ लाख रूपयांची मजुरी थकीत आहे. यामुळे रोहयो मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यासह जिल्हाभरातील मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्यासाठी राज्य शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, वन विभाग व कृषी विभागामार्फत ५० टक्के ग्राम पंचायत स्तरावर व ५० टक्के यंत्रणास्तरावर कामे सुरू आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १५२ ग्राम पंचायतीमार्फत विविध गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. यातून तीन हजारांहून अधिक मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. रस्ते, बोडी, मजगी, वृक्षल् ाागवड, राजीव गांधी भवन, शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची विहीर आदींची कामे सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना कामाची मजुरी थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. यासाठी मजुरांचे जॉबकार्ड व बँक बचत खात्याला आधारकार्ड क्रमांक जोडणे अत्यावश्यक आहे. मजुरांच्या बँक खात्याशी आधारकार्ड लिकिंग करण्याचे काम गतवर्षीपासून सुरू झाले आहे. मात्र ग्राम पंचायतपातळीवर ग्राम रोजगार सेवकांमार्फत चुकीच्या सूचना जात असल्याने अनेक मजूर विविध बँक खात्याशी आधारकार्ड क्रमांक जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी नरेगा विभागाला मजुरांच्या बँक खात्यात मजुरीचे पैसे वळते करण्यासाठी प्रचंड अडचण जात आहे. जिल्ह्यातील अनेक रोहयो मजुरांनी ग्राम रोजगार सेवक तसेच ग्राम पंचायत प्रशासनाकडे चुकीचे बँक खाते क्रमांक दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. रोहयो मजुरी थकीत असल्यामुळे अनेक मजूर ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालयात येरझारा मारीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)