शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

अहेरीतील रस्ते झाले अरूंद

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

येथील बसस्थानकासमोर गांधी चौक ते पेट्रोलपंपच्या मुख्य मार्गावर चहापान टपरी, गॅरेज, चिकन सेंटर आदींसह विविध अनेक दुकाने थाटण्यात आली आहे.

अहेरी : येथील बसस्थानकासमोर गांधी चौक ते पेट्रोलपंपच्या मुख्य मार्गावर चहापान टपरी, गॅरेज, चिकन सेंटर आदींसह विविध अनेक दुकाने थाटण्यात आली आहे. सदर विक्रेत्यांनी रस्त्यावर आपल्या दुकानाचे साहित्य ठेवून अतिक्रमण सुरू केले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे अहेरीचा मुख्य मार्ग अरूंद झाला आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा होत आहे. सदर समस्येने गंभीर रूप धारण करूनही पोलीस व नगर पंचायत प्रशासन अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.भविष्यात अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याच्या आशेने अहेरी शहरातील भूखंडाचे भाव वधारले आहे. दुकानासाठी भाड्याची खोली, निवासाची खोली आदीसह दुकानाच्या पगडीचे भावही गगणाला भीडले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक जागा मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून कब्जा करण्याचा सपाटा सुरू केला आहे. अहेरी जिल्हा निर्मितीनंतर अहेरी शहराची लोकसंख्या वाढणार असल्याने अतिक्रमण केलेली जागा मोठ्या भावात विकून आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या बेतातही अनेक नागरिक असल्याचे दिसून येत आहे. अहेरी सुभाषनगर मार्गावर अहेरी बसस्थानक व नव्याने झालेल्या पेट्रोलपंपामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. आधिच अहेरीचा मुख्य मार्ग अरूंद आहे. त्यात आता अतिक्रमणाची भर पडत असल्यामुळे सदर मुख्य मार्ग अधिकच अरूंद झाला आहे. दुकानात येणारे अनेक ग्राहक रस्त्यावरच आपली दुचाकी व चारचाकी वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.