शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीने रस्त्याची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:28 IST

सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला.

ठळक मुद्देवाहतुकीस अडथळा : राजन्नापल्ली मार्गावर बिघाड झालेला ट्रक उभा

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला. त्यामुळे सदर ट्रक तिथेच उभा ठेवण्यात आला आहे. परिणामी राजन्नापल्ली मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रेती भरलेल्या ओव्हरलोड ट्रकांच्या वाहतुकीने या रस्त्याची वाट लागली आहे.रेती भरलेला ट्रक पंक्चर झाल्याने सदर ट्रक शुक्रवारपासून राजन्नापल्ली मार्गावर उभा आहे. शनिवारी या ट्रकची दुरूस्ती सुरू होती. आरडा रेतीघाटावरून रेती वाहतुकीसाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आरडा गावातून तर दुसरा राजन्नापल्ली गावातून जातो. ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक आरडा गावातील मार्गावरून सर्रासपणे सुरू आहे. या दोन्ही गावातील नागरिकांचा गावातून जड वाहने आवागमनास विरोध आहे. मात्र प्रशासनाच्या बळजबरीने तसेच धाकाने व पोलिसांच्या कारवाईने नागरिकही हतबल आहेत.आरडा गावातील मार्गावरून डांबरी रस्त्याने ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. उखडलेल्या डांबरी मार्गावर कंत्राटदाराकडून मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. आरडा गावातील शाळेसमोरून रेती भरलेल्या ट्रकांचे आवागमन सुरू असते. त्यामुळे शाळेत ये-जा करणाºया विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका होण्याची शक्यताही नाकारताही येत नाही. ट्रकांच्या या आवागमनामुळे आरडा गावात येणारी महामंडळाची बस बंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.ट्रकांच्या वाहतुकीमुळे आरडा गावातून शिक्षणासाठी तालुकास्थळी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आरडा व राजन्नापल्ली गावातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून येत आहे.अधिकाºयांचे दुर्लक्षतालुक्याच्या राजन्नापल्ली व आरडा गावातील मार्गावरून ट्रकांद्वारे रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. त्यामुळे गावातील दोन्ही मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मात्र मार्गाच्या दुरवस्थेकडे तसेच ट्रकांवर कारवाई करण्याकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.