शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून रस्ता दुरूस्ती

By admin | Updated: September 23, 2016 01:41 IST

मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मन्नेराजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी श्रमदानातुन रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी,

मन्नेराजाराम, भामनपल्ली भाग : पोलीस व नागरिक कामाला लागलेभामरागड : मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या मन्नेराजाराम, भामनपल्ली गावातील नागरिकांनी श्रमदानातुन रस्ता दुरूस्ती करून गावात बसफेरी सुरू करावी, यासाठी बुधवारपासून पोलिसांच्या सहकार्याने रस्ता दुरूस्तीसाठी श्रमदान सुरू केले आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी रस्ता समस्येबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पोलीस विभागाला दिलेल्या निवेदनातून केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून मन्नेराजाराम-भामनपल्ली रस्ता व पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भितीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही. यावर तोडगा काढण्याबाबत सरकार गंभीर नसल्याने या भागात रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे.मागील दोन वर्षांपासून नागरिकांना खासगी प्रवाशी वाहनांचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ताडगाव पोलीस मदत केंद्रात जाऊन रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरिक्षक परजने यांनी सादर केले. त्यानंतर परजने यांनी यासंदर्भात भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या. मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांची वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन नागरिकांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याबाबत पोलीस विभागाने पावले उचलले. त्यानंतर ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी मन्नेराजाराम परिसरातील येचली, भामनपल्ली, मडवेली, मरपल्ली, झिंजगाव, मडवेली, चिचोडा, टोला, इरकडुम्मे, मोकेला, रेला, बोरीया, गोरनूर, पडतमपल्ली, कसनसूर, पल्ली, जुमाबाई, लंकनगुडा, रायगुडा, बासागुडा, गेर्रा, सिपनपल्ली, दुब्बागुड्डा, पल्ली या गावात सभा घेतल्या व नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्यातून रस्ता दुरूस्तीच्या कामात श्रमदान करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे बुधवारपासून ताडगावचे प्रभारी पोलीस अधिकारी परजने यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक दळवी, पाटील, बोरसे व नागरिक यांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले. तसेच खचलेल्या रस्त्यावर माती टाकली. आता या परिसरात बससेवा सुरू व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भामरागड तालुक्यात अनेक गावात रस्ते उखडलेले आहेत. त्याची दुरूस्तीच मागील पाच ते दहा वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. भामरागड-लाहेरी मार्गाची वाईट अवस्था झाली असून त्याच्याही दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)