शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या प्रश्नावर राकाँ आंदोलन करणार

By admin | Updated: October 5, 2016 02:27 IST

अहेरी व सिरोंचा आंतर तालुका व तालुक्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे ही पडले आहेत.

आत्राम यांची माहिती : आलापल्ली-आसरअल्ली मार्गाचे नूतनीकर कराअहेरी : अहेरी व सिरोंचा आंतर तालुका व तालुक्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे ही पडले आहेत. अहेरीत उपविभागातील मार्गाचे नुतनीकरण करावे, जिमलगट्टा व देचलीपेठा यांच्यातील दुवा असलेला किष्टापूर नाल्यावर पुलाचे काम त्वरित सुरु करावे, याशिवाय आलापल्ली ते आसरअल्ली मार्गाची दुरूस्ती करून बससेवा सुरू करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहे. आत्राम यांनी म्हटले आहे की, आलापल्ली-सिरोंचा, सिरोंचा-आसरल्ली, अहेरी शहर व आलापल्ली शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेकडो लोक या मार्गाने ये-जा करतात. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विविध आजार होत आहे. रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून देचलीपेठामार्गे सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली पर्यंतच्या मार्गावर खूप ठिकाणी नाल्यावर पूल नसल्याने येथील लोकांचा संपर्क नेहमी तुटत असतो. हा पूल नसल्यामुळे सिंदा, जोगणगुडा, देचली, पेठा, मेट्टीगुडम, बिऱ्हाडघाट, करजेली, रमेशगुडम, कोप्पेला व आसरअल्लीपर्यंत मार्ग तयार करावा, म्हणजे जवळजवळ तीन हजार लोकांचा संबंध जुळेल. त्यामुळे येथे पुलांचे बांधकाम होणे गरजेचे आहे.सोबतच अहेरी उपविभागातील कित्येक पूल क्षतिग्रस्त झालेले आहे. त्याकडे शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोपही धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. (शहर प्रतिनिधी)अहेरी उपविभागात राकाँ आक्रमकशासनाने आलापल्ली ते सिरोंचा व सिरोंचा ते आसरल्ली येथील मार्ग नूतनीकरण करावे व तालुका अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुझवावे क्षतिग्रस्त पूल त्वरित दुरुस्त करावे व किष्टापूर पुलाचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोठे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जहीर हकीम यांनी दिली आहे.