शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

गडचिरोलीतील रस्ते खोदणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:44 IST

गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरासाठी मंजूर असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व, म्हणजे १०२ किलोमीटर लांबीचे रस्ते या गटार लाईनच्या पाईपलाईनसाठी खोदले जाणार आहेत.

ठळक मुद्देभूमिगत गटार योजना । रस्त्याच्या मधोमध टाकणार १०२ किलोमीटरची पाईपलाईन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने शहरासाठी मंजूर असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्व, म्हणजे १०२ किलोमीटर लांबीचे रस्ते या गटार लाईनच्या पाईपलाईनसाठी खोदले जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षे शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.शहरातील भूमिगत गटार लाईनचे अंदाजपत्रक ६ वर्षांपूर्वीच तयार करण्यात आले होते. त्याला मंजुरीही मिळाली. परंतु हे काम करण्यासाठी बाहेरचे कुणीच कंत्राटदार गडचिरोलीत येण्यास इच्छुक नसल्यामुळे वारंवार निविदा बोलवूनही या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नव्हती. अखेर गुजरातमधील एनआरईपीसी प्रोजेक्ट प्रा.लि.सुरज या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. या कामाची एकूण किंमत ९६.५ कोटी रुपये आहे. मात्र ८३.४४ कोटीत हे कंत्राट सदर कंपनीला मिळाला आहे.हे काम सदर कंपनीकडून करवून घेण्याची जबाबदारी महाराष्टÑ जीवन प्राधीकरणवर टाकण्यात आली आहे. भूमिगत गटार लाईनसह खोदलेले रस्ते पूर्ववत दुरूस्त करण्याची तसेच नागरिकांच्या घरांपासून मुख्य पाईपलाईनपर्यंत कनेक्शन जोडण्याचीही जबाबदारी या कंपनीवरच राहणार आहे.रस्त्याच्या मधोमध भूमिगत गटार लाईनचे पाईप टाकले जाणार आहेत. ६०० ते ९०० मिमी (३ फूट) व्यासाचे हे पाईप टाकण्यासाठी रस्ता खोलवर खोदावा लागणार आहे. याशिवाय पाईपलाईनची पातळी (उतार-चढाव) याकडेही बारकारईने लक्ष द्यावे लागणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे.धानोरा-चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या कडेला खोदकामसध्या धानोरा रोड ते चंद्रपूर रोड या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाच्या एका बाजुचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन टाकण्यासाठी पूर्ण सिमेंट रस्ता फोडावा लागेल. हे काम खर्चिक असल्यामुळे या मार्गाच्या कडेने भूमिगत गटार लाईन टाकली जाईल. बाकी मार्गावर मात्र रस्त्याच्या मध्येच हे पाईपलाईन राहणार आहे.किमान तीन वर्षे चालू शकते कामहे काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात हे काम किमान तीन वर्षे चालण्याची शक्यता आहे. १०२ किलोमीटरचे रस्ते खोदून पाईपलाईन टाकणे आणि रस्ते पूर्ववत करणे हे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा