शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे रस्ता झाला अरूंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:14 IST

देसाईगंज शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावाहून येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शिवाय येथील काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. परंतु या समस्येची सोडवणूक करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदेसाईगंजातील स्थिती : व्यावसायिकांवर कारवाईकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावाहून येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शिवाय येथील काही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. परंतु या समस्येची सोडवणूक करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले देसाईगंज शहर आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्त्यावर जिथे जागा मिळेल तिथे आपल्या मनाजोगे व्यवसाय करणाºया लोकांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून अनेकांनी आपली दुकाने थाटली आहेत. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच आरमोरी ते कुरखेडा मार्गावर हुतात्मा स्मारक, विश्रामगृह मोटारस्टँड, तुकुम मार्गापर्यंत व्यावसायिकांनी लोखंडी रॉड वापरून सिमेंटचे पक्के बांधकाम केले आहे. या व्यावसायिकांनी दुकानातील साहित्य राजरोसपणे कासवगतीने का होईना पण पुढे-पुढे सरकवीत आहेत. याचा परिणाम वस्तूंची खरेदी करण्याकरिता येणारा ग्राहक आपली वाहने रस्त्यावर कशाही पद्धतीने उभे करून ठेवतात. या मार्गावर दुचाकी, चारचाकी, जवजड वाहने तसेच पादचारी आवागमन करीत असतात. त्यामुळे रस्ते कितीही रूंद असले तरी अतिक्रमणामुळे अरूंद झाले असून मार्गक्रमण करताना वाहनधारकच नव्हे तर पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.अतिक्रमणधारकांना स्थानिक प्रशासनाकडून अनेकदा नोटीस देण्यात आल्या. परंतु काहीच उपयोग झाला नाही. अतिक्रमणधारक नगर पालिका प्रशासनाच्या नोटीसकडे दुर्लक्ष करून आपला व्यवसाय थाटून आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण