शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

प्राणहिता नदीत दोघांना जलसमाधी

By admin | Updated: February 21, 2016 00:49 IST

तालुका मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा सर्कलच्या चंदारम शिवारातील प्राणहिता नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची ...

गावात शोककळा : रेगुंठा येथील घटनासिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा सर्कलच्या चंदारम शिवारातील प्राणहिता नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. लिंगय्या धर्मय्या बिरदू (३७) व तिरूपती मदनय्या नलगुंठा (३२) रा. रेगुंठा अशी मृतकांची नावे आहेत. लिंगय्या व तिरूपती या दोघांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास रेतीवर कपडे काढून ठेवून प्राणहिता नदीच्या पात्रात आंघोळ करण्यास सुरुवात केली. मात्र खोल पाण्यात गेल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. काही वेळाने रामलू हा नदीपात्रात गेला असता दोघेही पाण्यात बुडाले असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती रेगुंठाचे सरपंच श्रीनिवास कडार्लावार यांना देण्यात आली. रेगुंठाचे पोलीस पाटील पेंटय्या पुप्पाला यांनी ही माहिती पोलिसांना दिली. दोघांचेही मृतदेह सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. लिंगय्याच्या मुलीचा कानटोचणीचा कार्यक्रम असल्याने त्याची पत्नी पद्मा साहित्य खरेदी करण्यासाठी तेलंगणा राज्यातील मंचेरिअल येथे गेली होती. घटनेची माहिती दिल्यानंतर ती तत्काळ घरी परतली. मुलीचा कार्यक्रम असल्याने आत्महत्या करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना दिली. दोघेही पोहण्यात पटाईत असतानाही त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हे न उलगडणारे कोडे आहे. या घटनेचा तपास रेगुंठाचे प्रभारी अधिकारी रामेश्वर घोंडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार श्यामराव शेरकी, नाईक पोलीस मनीष गर्गे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)