शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम गावानींही मागितले ग्रामसभांना अधिकार

By admin | Updated: November 8, 2014 22:37 IST

जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून

एटापल्ली : जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून हे अधिकार आमच्या गावालाही मिळाले पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे ग्रामसभा नक्षलग्रस्त गावांमध्येही सक्षम होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावातील नागरिकांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. या निवेदनात बांबू विक्रीचे अधिकार ग्रामसभेला देण्यात यावे, बांबूला प्रतीनग ५० रूपये व प्रती बिंड्डल २५० रूपये भाव देण्यात यावा, आदिवासी भागात बांबू कटाईचा रोजगार हे आदिवासींसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे योग्य भाव देण्यात यावा, जेणेकरून आदिवासी नागरिकांची सावकार व व्यापारी वर्गांकडून आर्थिक पिडवणूक होणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे. बियाणे, हिरडा, मोह, टोळी, आवळा, बेहडा, लाख, चारोळी, डिंक आदी वनोपजांना योग्य भाव देण्यात यावा, अशीही मागणी सुरजागड परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय संविधानानुसार पाचवी अनुसूची (अनुच्छेद २४४८१) अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती (आदिवासी) यांचे प्रशासन व नियंत्रणकरिता तरतुदीनुसार आदिवासी भागात शांती व सुशासन नांदण्यासाठी ग्रामसभेची भारतीय संविधानात विशेष विधी व्यवस्था करण्यात आली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. एटापल्लीचे नायब तहसीलदार गेडाम यांना निवेदन देतांना आदिवासी विकास महामंडळाचे माजी संचालक सैनू गोटा, पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे, उपसभापती संजय चरडुके, मनोहर हिचामी आदी उपस्थित होते. या निवेदनावर राजू कोरसा, चंदू आत्राम, मैनू पुंगाटी, लाही कोरसा, लालचंद होळी, रामलू कोरच्या, मुनेश्वर पन्ना, दारासिंग तिर्की, दानू हिचामी, सन्नू पल्लो, जुगरू केरकेट्टा, टुलसा पुंगाटी, सूरज सरजू पुंगाटी आदींसह सुरजागड परिसरातील ७० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.