शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अपर आयुक्तांनी घेतला क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:40 IST

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा सोमवारी नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी घेतला. प्रकल्प कार्यालयातील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.

ठळक मुद्देराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा : प्रत्यक्ष पाहणीसह केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा सोमवारी नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी घेतला. प्रकल्प कार्यालयातील सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर २९ ते ३१ जानेवारीदरम्यान आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती या चार विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा संमेलनात राज्यातील १ हजार ७५७ आदिवासी खेळाडू आपले क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून पहिल्यांदाच आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यात होत आहे.नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सदर क्रीडा स्पर्धेची तयारी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी अपर आयुक्त मोडक यांनी गडचिरोलीला आज भेट दिली. प्रकल्प कार्यालयात आढावा सभा घेऊन त्यांनी प्रत्यक्ष तयारी जाणून घेतली. सोबतच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोणत्याही उणीवा राहणार नाही, याची खबरदारी घेण्याविषयी मार्गदर्शन केले. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना नेमून दिलेली जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना केल्या.संमेलनासाठी विविध समस्या गठीत केलेल्या आहेत. जिल्हा प्रेक्षागार मैदानावर सोमवारपासून नागपूर विभागातील खेळाडूंचे सराव शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरात आठ प्रकल्पातील ४२१ खेळाडूंचा समावेश आहे. या शिबिराला अपर आयुक्त मोडक यांनी भेट दिली. मैदानाची तसेच निवास व्यवस्थेची पाहणी करून उपस्थित कर्मचाºयांसोबत संवाद साधला. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, कार्यालय अधीक्षक डी.के. टिंगुसले, सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवनकर, आर. के. लाडे, वंदना महल्ले, आदिवासी विकास सहयोगी रामेश्वर निंबोळकर, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक सुधाकर गौरकर, विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर आदी उपस्थित होते.