लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा आमदार कृष्णा गजबे यांनी शुक्रवारी घेतला.बैठकीला उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार चरडे तसेच सर्व विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कुरखेडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रूपयांची कामे करण्याला परवानगी देण्यात आली आहे. शेतात आजपर्यंत धानपीक असल्याने तलाव, बोडी दुरूस्ती, सिंचन विहीर खोदकाम, शेततळ्याचे बांधकाम करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे कामांची गती मंदावली होती. आता मात्र पावसाळा संपला असल्याने कामे करण्यास गती देण्याचे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले. यावेळी अधिकाºयांनी प्रस्तावित कामे, पूर्ण झालेल्या कामांचा लेखोजोखा आमदारांसमोर मांडला.सिंचन सुविधा निर्माण करण्यावर राज्य व केंद्र शासन सर्वाधिक भर देत आहे. त्यामुळेच राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले असून या अभियानाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही. निधीची कमतरता भासल्यास आपल्याकडे तक्रार करावी. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन अधिकाºयांना दिले. सभेच्या वेळी तालुक्यातील धानपीक तसेच खरीप व रबी हंगामातील पिकांच्या स्थितीची माहिती आमदारांनी अधिकाºयांकडून घेतली.
कुरखेडातील सिंचन कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:07 IST
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा आमदार कृष्णा गजबे यांनी शुक्रवारी घेतला.
कुरखेडातील सिंचन कामांचा आढावा
ठळक मुद्देकामाला गती देण्याचे आमदारांचे निर्देश : पीक परिस्थितीबाबत घेतली माहिती