शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य व्यवस्थेचा आढावा

By admin | Updated: December 25, 2014 23:33 IST

राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील तालुका आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित आढावा बैठकीदरम्यान तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

अहेरी : राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील तालुका आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित आढावा बैठकीदरम्यान तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी सहसंचालक डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. अहेरी, एटापल्ली तालुक्यात यावर्षी मलेरियाचे हजारो रूग्ण आढळून आले आहेत. मलेरिया रोगाचा प्रसार कशा पद्धतीने कमी करावा, याबाबत उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉ. सतीश पवार यांनी मार्गदर्शन केले. फायलेरिया व डेंग्यू या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रूग्णांवर उपचार करण्याबरोबरच सदर रोग होणारच नाही, याची विशेष काळजी घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करावे, जेणेकरून रोगांचा प्रसार थांबविता येईल. आढावा बैठकीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यासुद्धा जाणून घेतल्या. काही रूग्णालयांमध्ये आवश्यक असलेली साधने उपलब्ध नसल्याची बाब आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली. सदर साधने तत्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले.आढावा बैठकीला सर्व ग्रामीण रूग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. संचालकांनी एटापल्ली ग्रामीण रूग्णालय, कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. नागरिकांसोबतही चर्चा केली. (तालुका प्रतिनिधी)