धानाेरा : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना शाखा धानोराच्या वतीने शुक्रवारी परमहंस राधेश्यामबाबा मंदिर लेखा येथे पोलीस पोलीस पाटील दिन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षटस्थानी महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेचे जिह्याध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे होते. प्रमुख अथिती म्हणून जिल्ह्य सचिव मुरारी दहीकर, आरमोरी तालुकाध्यक्ष नरेंद्र बनपूरकर, मुक्तिपथचे कार्यकर्ते अक्षय पेदिवार, धानोरा तालुकाध्यक्ष शिवकुमार भैसारे उपस्थित होते. कन्हाळगावचे सेवानिवृत्त पोलीस पाटील बिसन रैजू पदा, ढवडी येतील सेवानिवृत्त पोलीस पाटील शिवराम तुलावी यांचा पत्नी सपत्नीक शाल, श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन लता उईके, प्रास्ताविक मेघश्याम वनस्कर तर आभार सुरेश ऊसेडी यांनी मानले.