शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे 10 काेटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले. या कालावधीत गडचिराेली व अहेरी आगारांचे सुमारे १० काेटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. काेराेनापासून एसटीला ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काेराेना कालावधीत एसटी बरेच दिवस बंद हाेती. त्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र, काही दिवस एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ निम्म्याच प्रवाशांची वाहतूक केली जात हाेती. या कालावधीत तर डिझेलचा खर्चही भरून निघत नव्हता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. ५५ व्या दिवशीही हे आंदाेलन सुरूच आहे. काेराेनापूर्वी गडचिराेली आगाराला दररोज ९ लाख ५० हजार रूपये तर अहेरी आगाराला ७ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळत हाेते. मात्र, संपामुळे या संपूर्ण उत्पन्नावर पाणी पडले आहे. 

एवढे नुकसान कधीच झाले नाही-    एसटीच्या इतिहासातील हा सर्वात माेठा संप आहे. एसटीचे चाक नेहमीच ताेट्यात हाेते. मात्र एवढे नुकसान कधीच झाले नाही. संपामूळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटीला फार माेठी कसरत करावी लागणार आहे. 

एसटीविना नागरिकांना आता प्रवासाची सवय झाली

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे अनेकांनी खासगी वाहने खरेदी केली आहेत. त्यामुळे एसटीशिवाय प्रवास करण्याची हळूहळू सवय पडत चालली आहे. एसटीशिवाय नागरिक प्रवासच करू शकत नाही. या भ्रमात एसटी कर्मचाऱ्यांनी राहू नये. अडचणीच्यावेळी प्रत्येक माणुस आपला मार्ग शाेधताेच.- आकाश देवतळे, युवक 

एसटी कर्मचाऱ्यांंना बाहेरच्या बेराेजगारीचा अजूनपर्यंत अंदाज आलेला नाही. शासनाने पदभरतीची जाहीरात काढल्यास लाखाे युवक एसटीत काम करण्यासाठी अर्ज करतील. शासनाने आजपर्यंतची सर्वात माेठी पगारवाढ दिली असताना एसटी कर्मचारी आंदाेलनावर कायम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांविषयी जनतेच्या मनात असेलेली सहानुभूती आता संपत चालली आहे. - देवेंद्र शिंदे, युवक

५ महिने काेराेनाचा  बसला फटकामागील दीड वर्षात काेराेनाची साथ हाेती. या कालावधीत जवळपास ५ महिने एसटीसेवा बंद हाेती. काेराेनाच्या कालावधीत एसटी सुरू झाली असली तरी पुरेसे प्रवाशी मिळत नसल्याने ताेटाच हाेत हाेता. 

संपाचे ५५ दिवस

मागील ५५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या कालावधीत एसटीचे उत्पन्न जवळपास शुन्य आहे. वाहने बंद असली तरी देखभाल खर्च सुरूच आहे. त्यामुळे ताेटा वाढत चालला आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप