शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मिशन इंद्रधनुष्यवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोेली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दोन वर्ष वयाच्या आतील बालकांना राष्टÑीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे सुटलेल्या लाभार्थी बालकांना लस देण्यासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गृहभेटी, सर्वेक्षण व बैठक तसेच मासिक अहवालावर बहिष्कार टाकल्याने सदर मिशन इंद्रधनुष्य मोहिमेवर परिणाम ...

ठळक मुद्दे उपकेंद्रस्तरावरील सेवा प्रभावित : अंगणवाडी कर्मचाºयांचा गृहभेटी व सर्वेक्षणावर बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोेली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दोन वर्ष वयाच्या आतील बालकांना राष्टÑीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे सुटलेल्या लाभार्थी बालकांना लस देण्यासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गृहभेटी, सर्वेक्षण व बैठक तसेच मासिक अहवालावर बहिष्कार टाकल्याने सदर मिशन इंद्रधनुष्य मोहिमेवर परिणाम होत आहे. विशेष म्हणजे सदर मोहीम राबविण्याची जबाबदारी आरोग्यसेवक व सेविकांवर येऊन पडली आहे.पंतप्रधान सरल योजनेतून विशेष मिशन इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली आहे. सदर कार्यक्रम हा आशावर्कर व अंगणवाडी कर्मचाºयांच्या माध्यमातून राबवायचा आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी प्रशिक्षण व सर्वेक्षण कामावर बहिष्कार टाकल्यामुळे हे काम आरोग्यसेवक व सेविकांनाच करावे लागत आहे. परिणामी उपकेंद्र सोडून तसेच इतर आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करून या कामात व्यस्त राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावरील आरोग्यसेवा अस्थिपंजर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अडीच हजारांवर अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या कारभारावर बाराही तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे नियंत्रण असते. मात्र अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाडी सेवा वगळता इतर कामांवर बहिष्कार टाकला आहे. सकाळी अंगणवाडी उघडून पोषण आहार शिजवून तो बालकांना वाटप करण्याचे काम कर्मचारी करीत आहेत.विशेष मिशन इंद्रधनुष्य सर्वेक्षणाअंतर्गत आरोग्य कर्मचाºयांना प्रत्येक गावात जाऊन दोन वर्षाआतील बालकांचे आतापर्यंतचे आवश्यक असलेले लसीकरण झाले काय, याची चाचणी करायची आहे. शिवाय आरोग्यसेवक व सेविकांना सर्वेक्षणाबाबत विशिष्ट परिपत्रक देण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी असलेल्या घरांचा क्रमांक, एम.सी. कार्ड क्रमांक, लाभार्थ्याचे नाव, महिन्यानुसार विविध प्रकारचे झालेले लसीकरण आदी माहिती संकलीत करून या प्रपत्रात भरावयाची आहे. या कामासाठी सर्व उपकेंद्रातील आरोग्यसेवक व आरोग्यसेविका आता गावातील वॉर्डावॉर्डात फिरत आहेत. आरोग्य कर्मचाºयांमार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २९ आॅगस्ट २०१७ पासून घरोघरी जाऊन हेडकाऊंटिंग सुरू आहे.या सर्व कामाचा भार आरोग्य कर्मचाºयांवर पडला आहे. त्यामुळे त्यांचे उपकेंद्राअंतर्गत देणाºया येणाºया आरोग्यसेवेकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे.११ सप्टेंबरपासून बेमुदत संपअंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधन वाढीचा निर्णय शासनाने १० सप्टेंबरपर्यंत घ्यावा, सदर निर्णय न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. शिवाय आयटक संघटनेच्या वतीने ११ सप्टेंबरला गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांनी दिली.प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मानधनवाढ समिती गठित केली. या समितीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला. त्यानंतर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत संघटनेची तिनदा बैठक झाली. मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांशी चर्चा करून पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ना. मुंडे यांनी दिले होते. मात्र मानधन वाढीसंदर्भात शासनाकडून निर्णय झाला नाही. त्यामुळे आयटक संघटनेच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाºयांनी आॅगस्ट महिन्यापासून अंगणवाडी बाह्य कामांवर बहिष्कार टाकला आहे.- देवराव चवळे, जिल्हा संघटकतथा राज्यसचिव, आयटक