शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीसह अहेरी उपविभागात संपाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:47 IST

शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्याने शाळा ओस पडल्या होत्या.

ठळक मुद्देशिक्षक सहभागी झाल्याने शाळा ओस : उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांनी ७ ते ९ आॅगस्ट यादरम्यान संप पुकारला आहे. या संपाच्या पहिल्या दिवशी चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागात कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनेक शिक्षक या संपात सहभागी झाल्याने शाळा ओस पडल्या होत्या. शिक्षक, महसूल, आरोग्य व इतर कर्मचारी संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.जवळपास ९० टक्के शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प पडले होते. अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा या पाचही तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाºयांविना शुकशुकाट दिसून येत होता. अनेक कार्यालयांतील टेबल व खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या.महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती चामोर्शीच्या वतीने सदर संपाच्या पहिल्या दिवशी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जुनी पेंशन योजना व सातवा वेतन आयोग लागू करावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्टÑ राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे चामोर्शी तालुकाध्यक्ष दीपक पुंगाटी, सरचिटणीस सूजित दास, कार्याध्यक्ष सुरेश पालवे, सचिन गायधने, दिनेश वागले, विलास माळवे, किशोर कोडापे, धनंजय शेंडे, विजय करपते आदींसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अहेरी, मुलचेरा, भामरागड येथेही कर्मचाºयांच्या विविध संघटनांमार्फत संप पुकारण्यात आला. निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी कर्मचाºयांच्या निषेध सभाही पार पडल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कर्मचाºयांविरोधी शासन धोरणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा आदी पाच तालुक्यातही कर्मचाºयांकडून संपाला भरघोस प्रतिसाद मिळाला.सदर संप यशस्वी करण्यासाठी संघटनांच्या वतीने गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन सभाही घेण्यात आल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा संप यशस्वी करावा, असे आवाहन संघटनांच्या पदाधिकाºयांनी केले होते. बुधवारी व गुरूवारीही संपामुळे विविध कार्यालयातील प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता अधिक आहे. वरिष्ठ अधिकारी या संपाच्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Government Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप