शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:37 IST

राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्या, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जि. प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना विमाशिसंचे निवेदन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्या, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जि. प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनात, राज्यातील शिक्षक, कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्र शासनाप्रमाणे १ जानेवारी २०१६ पासून लागू कराव्या, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी. प्लॉन मधील शाळांचे नॉन प्लॉनमध्ये रूपांतर करावे, मासिक वेतन १ तारखेस अदा करावे, २० टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील सर्वच शाळांना, वर्ग तुकड्यांना पुढील टप्पा अनुदान विनाअट मंजूर करणे, निकष पात्र विना अनुदानित शाळा, वर्गतुकड्यांना सरसकट अनुदान मंजूर करावे, राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याबाबत २३ आॅक्टोबर २०१७ चा जाचक शासननिर्णय रद्द करावा. २० डिसेंबर २०१७ रोजी विधानसभेत मंजूर केलेला महाराष्ट्र स्वयं अर्थसहायीत शाळा सुधारणा विधेयकाचा निर्णय रद्द करण्यात यावा, सर्व अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करावे. राज्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देताना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्यवाह अजय लोंढे, सुरेंद्र मामीडवार, रवींद्र बांबोळे, रेवनाथ लांजेवार, यादव बानबले, मनोज निंबार्ते, अजय वर्धलवार, जगदीश राकडे व माध्यमिक शिक्षक संघाचे उपस्थित होते.