शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कासाठी सभापती सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:07 IST

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आहेत.

ठळक मुद्देकार्यकर्ते नागरिकांच्या दारी : विविध योजनांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आहेत.अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांतील हजारो शेतकरी वनहक्क पट्टे मिळण्यास पात्र आहेत. मात्र काहींनी प्रस्ताव तयार केले नाही तर काही नागरिकांचे प्रस्ताव तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयात पडून आहे. १५ दिवसांपूर्वी उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर तीन पिढ्यांची अट रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. एवढेच नाही तर श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देणे, रेशन कार्ड तयार करून देणे आदी कामे करीत आहेत.यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे कार्यकर्त्यांच्या मार्फत स्वत: गोळा करीत आहेत. गावागावात सभा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. ज्या नागरिकांचे प्रस्ताव अपुऱ्या दाखल्यांमुळे प्रलंबित आहेत. त्याची माहिती मागवून सदर प्रस्ताव जोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात वनहक्क पट्टे वाटपाच्या कामाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग