शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 01:26 IST

जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता गृहाचे काम पूर्ण केलेल्या एका खासगी कंत्राटदाराने कामाचे देयक काढण्याच्यासंदर्भात संबंधित

नासिरखॉपल्ली जि.प. शाळेतील घटना : जखमी मुख्याध्यापक सिरोंचा रूग्णालयात दाखल सिरोंचा : जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता गृहाचे काम पूर्ण केलेल्या एका खासगी कंत्राटदाराने कामाचे देयक काढण्याच्यासंदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाशी भांडण करून मुख्याध्यापकाला खूर्चीने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नासिरखॉपल्ली जि.प. शाळेत घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव रमेश अग्गुवार असे आहे तर मारहाण केलेल्या कंत्राटदाराचे नाव राजन्ना पोचम तोटा रा. रामंजापूर असे आहे. राजन्ना तोटा हा कंत्राटदार असून गेल्या १० वर्षात त्याने सिरोंचा तालुक्यात ग्रामपंचायत इमारतीचे अनेक बांधकाम केले. तसेच अंगणवाडी इमारत व शाळा दुरूस्तीची कामे त्याने केली आहेत. तोटा या कंत्राटदाराने सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत नासिरखॉपल्ली जि.प. शाळेत स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. या बांधकामाचे देयक प्रलंबित आहे. सदर कामाच्या देयकाबाबत जाब विचारण्यासाठी कंत्राटदार राजन्ना तोटा हे नासिरखॉपल्ली शाळेत शनिवारी गेले. तेथील मुख्याध्यापक रमेश अग्गुवार याच्याशी त्याने कामाचे देयक काढण्याच्या बाबीवरून भांडण केले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान कंत्राटदाराचा राग अनावर झाल्याने सदर कंत्राटदाराने चक्क मुख्याध्यापकाला त्याच्या खोलीत बंद करून खूर्चीने त्याला बेदम मारहाण केली. या मुख्याध्यापकाला दुखापत झाली. सध्या मुख्याध्यापक अग्गुवार हे सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. सदर कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शिक्षक संघटनांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) पोलिसांत तक्रार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल कंत्राटदाराच्या मारहाणीत जखमी झालेले नासिरखॉपल्ली जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रमेश अग्गुवार यांनी या घटनेची तक्रार सिरोंचा पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून कंत्राटदार रमेश अग्गुवार याचेवर भादंविचे कलम ३२४, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी कंत्राटदार अग्गुवार याला अटक केली नव्हती. घटनेच्या वेळी मुख्याध्यापकांसोबत एक शिक्षक उपस्थित होते. मात्र कंत्राटदाराने मुख्याध्यापकाच्या खोलीचे दार लावल्यानंतर सदर शिक्षक बाहेर राहिले. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.