शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:27 IST

नागरिकांच्या स्वच्छताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शहराला गोदरीमुक्त करून स्वच्छता अभियानात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्थानिक नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध करून दिले.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे आवाहन : गडचिरोली नगर परिषदेत उद्घाटन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नागरिकांच्या स्वच्छताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शहराला गोदरीमुक्त करून स्वच्छता अभियानात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्थानिक नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध करून दिले. सदर स्वच्छता अ‍ॅप नागरिकांनी आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी या अ‍ॅपद्वारे नोंदवाव्या. प्राप्त तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात येईल, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत न. पं. च्या वतीने पालिकेच्या सभागृहात मंगळवारी स्वच्छता अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, पोलीस निरीक्षक संजय सांगोळे, नगरसेविका रितू कोलते, अल्का पोहणकर आदी उपस्थित होत्या.घंटागाडी, मृत जनावरे, वीज जोडणी, रस्ते सफाई, कचरा तसेच सार्वजनिक शौचालय आदीबाबतच्या तक्रारी या अ‍ॅपवर नोंदविता येणार आहे, असे नगराध्यक्ष पिपरे यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी न. प. कर्मचारी हजर होते.नगरसेवकांची पाठगडचिरोली नगर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून या पक्षाचे एकूण २३ नगरसेवक आहेत. इतर पक्षाचे केवळ दोन नगरसेवक असल्याने विरोधक उरलेच नाही. मात्र सदर स्वच्छता अ‍ॅप कार्यक्रमाला निमंत्रणपत्र देऊनही स्वपक्षाच्याच नगरसेवकांनी पाठ फिरविली. सदर कार्यक्रमाला न. प. पदाधिकाऱ्यांसह पाच नगरसेवक उपस्थित होते. समन्वय व नियोजनाचा अभाव असल्याने नगरसेवकांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा शहरात आहे. स्वच्छता व विकासाच्या मुद्यावर नगरसेवकांना एकत्र आणने गरजेचे आहे.