शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शिक्षकांची बदली करा : शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा ऐरणीवर

By admin | Updated: July 9, 2015 01:50 IST

नवरगाव येथील पहिली ते पाचवीच्या जि. प. प्राथमिक शाळेमधील दोन्ही शिक्षक कोरची तालुका मुख्यालयावरून ये-जा करतात

कोरची : नवरगाव येथील पहिली ते पाचवीच्या जि. प. प्राथमिक शाळेमधील दोन्ही शिक्षक कोरची तालुका मुख्यालयावरून ये-जा करतात याशिवाय बऱ्याचदा ते उशिरा शाळेमध्ये येतात तर कधी कधी शाळेत येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी अखेर बुधवारी नवरगाव जि. प. शाळेला कुलूप ठोकले. नवरगाव येथील पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळेमध्ये एकूण ३६ विद्यार्थी पटसंख्या आहे. या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सी. एम. काटेखाये व सहाय्यक शिक्षक जी. डी. सहारे हे दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेच्या गावी मुख्यालयी राहून शिक्षणाचे कार्य करावे, असा शासकीय दंडक आहे. मात्र या शाळेतील सदर दोन्ही शिक्षक कोरची तालुका मुख्यालयी वास्तव्यास राहून तेथून नवरगावच्या शाळेत ये-जा करतात. त्यामुळे त्यांचे या शाळेकडे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नवरगाव शाळेतील मुख्याध्यापिका काटेखाये व सहाय्यक शिक्षक सहारे यांची इतर शाळेत बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षक बदलीच्या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी बुधवारी नवरगाव शाळेला कुलूप ठोकले. आंदोलन सुरू असताना शिक्षक ११.३० वाजता नवरगावात पोहोचले होते. यावेळी आंदोलनात सभापती अवधराम बागमुळ, बरातू ठेला, कनसराम काटेंगे, श्यामकुवर यादव, महेश बखर, सुकलू काटेंगे, सीमा काटेंगे, रामलाल भुतबिलई, अंतकला कल्लो, कौशिला होळी, अमाय काटेंगे, पवित्रा भैसारे, घुमूळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)