शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बदली यादी प्रसिद्धीस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:32 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची यादी रविवारी रात्रीच जिल्हा परिषदेला उपलब्ध झाली. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही सदर यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर विस्तापीत झालेल्या ४३० शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली नाही.

ठळक मुद्देउत्कंठा कायम : ४०० शिक्षक ठरले विस्थापित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची यादी रविवारी रात्रीच जिल्हा परिषदेला उपलब्ध झाली. मात्र दोन दिवसांचा कालावधी उलटूनही सदर यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर विस्तापीत झालेल्या ४३० शिक्षकांचीही नावे जाहीर करण्यात आली नाही.शिक्षकांची यादी ग्राम विकास मंत्रालयातून सर्व प्रथम जिल्हा परिषदेला पाठविली जाते. सीईओंचे सही झाल्यानंतर सदर यादी तत्काळ त्याच दिवशी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविणे आवश्यक होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या यादीवर सोमवारी व मंगळवारी दिवसभर सहीच केली नाही. मंगळवारी सायंकाळी सही झाल्यानंतर सदर आदेश बीओंना पाठविण्यात आले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.ज्या शिक्षकांनी पसंतीक्रम दर्शविलेल्या २० शाळा मिळाल्या नाहीत. त्यांना विस्थापीत शिक्षक म्हणून घोषीत करण्यात येते. गडचिरोली जिल्ह्यात ३६४ प्राथमिक शिक्षक, ४४ पदवीधर, दोन उच्च श्रेणी मुख्याध्यापक असे एकूण ४०० शिक्षक विस्थापीत ठरले आहेत. त्यांना पुन्हा शाळेची निवड करण्याची संधी दिली जाणार आहे. याबाबतचे पोर्टल मंगळवारी सकाळपासून सुरू झाले. ३१ मे ही शेवटची तारीख आहे. म्हणजेच शिक्षकांना केवळ दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांना बरीच धावपळ करावी लागणार आहे. त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्यास शिक्षकांना पुन्हा शाळेची निवड करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी उरकुडे हे मात्र विस्थापीतांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, याचा अंदाज बांधत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या सुरू आहेत. यामध्ये सीईओ व्यस्त आहेत. ते नवीन असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करून बदली यादीवर सही करून ती बीओंकडे पाठविण्याची विनंती शिक्षण विभागाने करणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही.