शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शार्पशूटर्सची दोन पथके पुन्हा आरमोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 01:05 IST

आरमोरी व वडसा वन परिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन इसमाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी

सर्चिंग आॅपरेशन सुरू : ‘त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग सज्जलोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी व वडसा वन परिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन इसमाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून शार्पशूटरचे दोन पथक २७ व २८ मे रोजी आरमोरीत दाखल झाले होते. वन विभाग व शापशूटरच्या संयुक्त पथकाने सर्चिंग आॅपरेशन राबवूनही नरभक्षक वाघ गवसला नाही. दोन दिवसांची मुदत संपल्यानंतर शार्प शुटरचे पथक माघारी परतले होते. त्यानंतर पुन्हा वाघाची भीती निर्माण झाल्याने वडसाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या पाठपुराव्यातून शार्प शुटरचे दोन पथक पुन्हा आरमोरीत दाखल झाले आहेत.आरमोरी व वडसा तालुक्यातील रवी, अरसोडा, कोंढाळा, मुलूरचक, उसेगाव आदी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर वाढलेला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात वाघ दबा धरून बसला असल्याने नागरिकांमध्ये भिती आणखीच वाढली आहे. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने रवी व कोंढाळा परिसरात पिंजरे लावले. याशिवाय वाघाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने ट्रॅपींग कॅमेरेही लावले. तसेच या भागात वन कर्मचाऱ्यांच्या गस्तीचे प्रमाणही वाढविण्यात आले. एवढे सारे करूनही वाघ पिंजऱ्यात जेरबंद झाला नाही. वनमंत्री व प्रधान वन सचिवांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील शार्प शुटरचे दोन पथके २७ व २८ मे रोजी आरमोरीला पाठविण्यात आले होते. सर्चिंग आॅपरेशन करूनही वाघ पथकाला गवसला नाही. त्यामुळे मुदत संपल्यानंतर शार्प शुटरची दोन पथके २९ मे रोजी ताडोबाला परतले. त्याच दिवशी २९ मे ला उसेगावजवळील तलावात सायंकाळी या नरभक्षक वाघाने बस्तान मांडले होते. मात्र शार्पशूटर अभावी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाला जेरबंद करू शकले नाही. शार्प शुटर परत गेल्याने वाघ आता जेरबंद होणार की नाही, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. भितीपोटी अनेक नागरिक व शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामाकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे.शनिवारपासून पथक वाघाच्या मागावरशार्पशूटर्सची दोन पथके ३ जून रोजी शनिवारला आरमोरीत दाखल झाले आहे. वाघाला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पथक व वन विभागाच्या संयुक्त चमू मार्फत शोधमोहीम सुरू झाली आहे. युध्दपातळीवर सर्चिंग आॅपरेशन सुरू असून वाघाचे लोकेशन घेण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे तो नरभक्षक वाघ लवकरच जेरबंद होईल, अशी आशा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शार्पशूटर्सच्या दुसऱ्या फेरीत नरभक्षक वाघ जेरबंद होणे आवश्यक आहे. नरभक्षक वाघ जेरबंद होईपर्यंत ताडोबा येथील शार्प शुटरचे पथक परत पाठवू नये, अशी मागणी रवी, कोंढाळा परिसरातील नागरिकांकडून होत आहे. धान रोवणी सुरू होण्यापूर्वी वाघाचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.