महसूल कल्याण निधी समितीची सभा : कोरची तहसीलदारावर कारवाई करागडचिरोली : महसूल कल्याण निधी समतीची सभा ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला तहसीलदार कुमरे, सुनील चडगुलवार, बावणे, चंदू प्रधान, अहमदवार, कोल्हटकर आदी उपस्थित होते. या बैठकीत महसूल कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रकरण तत्काळ निकाली काढणे, पदोन्नती झाल्यानंतर रिक्त पदे तत्काळ भरणे, महसूल भवनाकरिता जमीन संपादन करणे, महसूल कर्मचाऱ्यांच्या दहावी व बारावीमधील ८० टक्के गुण प्राप्त केलेल्या पाल्यांचा सत्कार करणे, महसूल कल्याण निधी वर्गणीमध्ये वाढ करणे, कोरचीचे तहसीलदार बोरूडे यांनी अर्वाच्य भाषेत न.पा.प्र. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करणे आदी ठराव पारित करण्यात आले. याशिवाय महसूल कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात प्लॉट उपलब्ध होण्याच्या दृष्टीने गृह निर्माण सोसायटीची स्थापना करावी. या कामासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी गाढे यांनी या बैठकीत दिले.
पदोन्नती प्रकरणे तत्काळ निकाली काढा
By admin | Updated: September 6, 2015 01:21 IST