शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत वाघाच्या २ बछड्यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळले, वाघिणीचा शोध सुरू

By दिगांबर जवादे | Updated: January 8, 2023 10:23 IST

वनविभागाने या हिंस्त्र वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

दिगांबर जवादे, गडचिरोली

गडचिरोली: तालुक्यातील अमिर्झा  बीटात पाच महिन्यांचे वय असलेल्या वाघाच्या  बछड्यांच्या दोन मृतदेहाचे अवशेष आढळून आले आहेत.अमिर्झा  परिसरात टी-६ या वाघिणीचा मागील दोन वर्षांपासून वावर आहे. या वाघिणीला एकूण चार बछडे होते. मृतदेहाचे अवशेष आढळलेले बछडे याच वाघिणीचे असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वाघिणीने आजपर्यंत १० नागरिकांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाकडे आहे.

वनविभागाने या हिंस्त्र वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. अशातच ३ जानेवारी रोजी  एका बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. त्यानंतर ६ जानेवारी रोजी पुन्हा २०० मीटर अंतरावर दुसऱ्या बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. अवशेषांमध्ये डोक्याची कवठी व शेपटीचा समावेश आहे. या परिसरात जवळपास सहा वाघ आहेत. यापैकी एका वाघाने बछड्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या परिसरात अवशेष आढळले तेथे वाघाची विष्टा आढळून आली. अवशेष हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. या ठिकाणी डीएनए चाचणी होईल. त्यानंतर सदर बछडे नेमके कोणत्या वाघाचे आहेत हे स्पष्ट होईल.

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली