शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तिघांच्या निगेटिव्ह अहवालाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

२७ मे रोजी मुंबई येथून नागपूरपर्यंत विमानाने प्रवास करून पाच प्रवाशी गडचिरोली येथे आले. त्यातील तीन प्रवाशी एका कुटुंबातील व इतर दोन प्रवाशी वेगवेगळ्या कुटुुंबातील आहेत. पाच पैकी चौघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. एक महिला गरोदर असल्याने तिला गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या पैकीच तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

ठळक मुद्देदोन रूग्णांची भर : धानोरा तालुक्यातील दोघे कोरोनापासून झाले मुक्त; एकूण रूग्ण संख्या १५ वर स्थिर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील गांधी वार्डातील दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या कुटुंबातील एक व्यक्ती शहरात अनेक ठिकाणी फिरला होता. त्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांच्यासोबत मुंबईवरून आलेल्या इतर दोघांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे.२७ मे रोजी मुंबई येथून नागपूरपर्यंत विमानाने प्रवास करून पाच प्रवाशी गडचिरोली येथे आले. त्यातील तीन प्रवाशी एका कुटुंबातील व इतर दोन प्रवाशी वेगवेगळ्या कुटुुंबातील आहेत. पाच पैकी चौघांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. एक महिला गरोदर असल्याने तिला गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी पती-पत्नीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या पैकीच तिसऱ्या सदस्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. विमानात सहप्रवाशी असलेल्या इतर दोघांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तिघांनाही संस्थात्मक विलगीकरणातच ठेवले आहे. इतर ५१ नागरिकांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह गरोदर महिलेच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या १७ व मध्यम जोखमीच्या १६ लोकांपैकी तीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित नमुने घेणे सुरू आहे. आजूबाजूच्या घरात तीन मोलकरीन होत्या. सर्व मोलकरीन पॉझिटीव्ह महिलेच्या सानिध्यात आल्या नव्हत्या. मात्र त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून गृह विलगीकरणात ठेवले आहे. गरोदर महिला व तिचा पती यांचा अहवाल जरी पॉझिटीव्ह आला असला तरी सध्या त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांच्यासोबत प्रवास केलेले इतर तिघे निगेटीव्ह आल्याने कोरोना पॉझिटीव्ह दोघांकडून संसर्गाचा धोका ओलांडला असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.शिवणी खुर्द येथील दोन पॉझिटिव्हआरमोरी तालुक्यातील मोहझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवणी खुर्द येथे आलेल्या पती, पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या गावात खळबळ माजली आहे. पॉझिटिव्ह आलेले रूग्ण हे मुंबई येथून शिवणी खुर्द येथे परत आले. पती हा मुंबई येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचे वय जवळपास ५० वर्ष आहे. तर पत्नी ४० वर्ष वयाची आहे. ते ३ जून रोजी मुंबईवरून शिवणी खूर्द येथे पोहोचले. त्यांना गावातील शाळेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसºया दिवशी ४ जून रोजी आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. ५ जून रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले. ६ जूनच्या रात्री उशिरा त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांनाही जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. जे लोक या दोघांच्या संपर्कात आले त्यांची माहिती घेतली जात आहे. ते ज्या शाळेत थांबले तो परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आला आहे. गावात आलेले व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्याने शिवणी खुर्द येथील नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. झाड आडवे पाडून गावाकडे जाणारा रस्ता बंद केला.दोन रूग्ण झाले कोरोनामुक्तधानोरा तालुक्यातील दोन रूग्णांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यात १५ अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या