शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:48 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, ....

ठळक मुद्देपाणीपातळी घटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली असून त्याचा फटका गडचिरोली शहराला बसत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नगर परिषदेने नदीपात्रात इनटेक वेल खोदली आहे. त्याच्या सभोवताला रेतीचा बंधारा सुद्धा बांधला आहे. विहिरीला दोन वॉल्व बसविण्यात आले आहेत. मात्र नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने एक वॉल्व पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारे पंप बंद ठेवावे लागत आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. काही वॉर्डात दिवसातून एकचवेळा पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपातळी आणखी कमी झाल्यास दुसरा वॉल्व सुद्धा पाण्याबाहेर पडण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. अजून एप्रिल, मे व जून हे तीन महिने शिल्लक आहेत. पाण्याची पातळी आणखी कमी झाल्यास तीव्र जलसंकटांचा सामना करावा लागणार आहे. नगर परिषदेला दुसरे पाण्याचे स्त्रोत नाही. परिणामी वैनगंगा नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने गोसेखुर्द धरणाचे पाणी नदीत साडावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, भूपेश कुळमेथे, पाणीपुरवठा विभागाचे शरद सोनटक्के उपस्थित होते.