शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रुग्णांचे नातेवाईक बनताहेत सुपरस्प्रेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पण लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य स्वरूपाच्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनीही इतरांना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेऊन घराबाहेर पडायलाच नको. कोरोना विषाणूच्या संसर्गाने रुग्ण फणफणत असताना त्याचे नातेवाईक आपले दुकान उघडून आपला व्यवसाय करीत आहेत.

ठळक मुद्देदेसाईगंज बाजारपेठेतील कारभार : तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या देसाईगंज शहरात कोरोना विषाणूने चांगलाच कहर केलेला आहे. घरोघरी कोरोना विषाणूच्या संसर्गाने रुग्ण फणफणत असताना त्याच्या घरातील नातेवाईक कोणी आपला दुकान उघडून आपला व्यवसाय करीत आहेत; तर कोणी सामान घेण्यासाठी बिनधास्तपणे बाजारपेठेत फिरत आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात काेराेनाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आराेग्य विभागाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.  कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पण लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य स्वरूपाच्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनीही इतरांना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेऊन घराबाहेर पडायलाच नको. कोरोना विषाणूच्या संसर्गाने रुग्ण फणफणत असताना त्याचे नातेवाईक आपले दुकान उघडून आपला व्यवसाय करीत आहेत. तर कोणी घरात संपलेले सामान घेण्यासाठी बिनधास्तपणे बाजारपेठेत फिरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. हे नागरिक काेराेना विषाणूचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, देसाईगंज शहरातील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त काही दुकाने अर्धवट शटर उघडून सुरू आहेत. देसाईगंज हा जिल्ह्यातील औद्यागिक दृष्ट्या प्रगत तालुका आहे. देसाईगंज शहरातील अनेक नागरिक देश-विदेशांत राहतात. असे असतानाही मागील वर्षी पहिल्या काेराेना लाटेच्या वेळी देसाईगंज तालुका काेराेनामुक्त हाेता. त्यानंतरही काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेती. आता मात्र देसाईगंज तालुक्यात काेराेना राेगाने थैमान घातले आहे. सध्या देसाईगंज तालुक्यात ४९० सक्रिय काेराेना रुग्ण आहेत. गडचिराेली तालुक्यानंतर सर्वाधिक रुग्ण गडचिराेली तालुक्यात आहेत. प्रशासनाने कठाेर पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. 

‘त्या’ अनधिकृत कोविड हॉस्पिटलमध्ये मृतकांची संख्या ५० पेक्षा अधिक ?

देसाईगंज नगर परिषदच्या हद्दीत दोन हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने या रुग्णालयांना सील ठाेकले आहे. या अनधिकृत रुग्णालयांमध्ये मागील एक वर्षाच्या आत ५० पेक्षा अधिक काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची चाैकशी करण्याची गरज आहे. या रुग्णालयांमध्ये गडचिराेली जिल्ह्यासह चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांतीलही रुग्ण उपचार घेत हाेते. नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भरती करण्यापूर्वी कोरोना विषाणूने रुग्ण संसर्गित नाही, याची खातरजमा केल्याशिवाय रुग्णांना भरती करूच नये असे जिल्हा आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे. या नियमाचे उल्लंघन करून काेेराेना रुग्णांवर  उपचार केले जात हाेते. याबाबत मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांना विचारणा केली असता शहरातील दोन हॉस्पिटलकडे कोविड केअर हॉस्पिटलचा परवाना नाही. कोविडचे रुग्ण आढळले हे खरे आहे. चाैकशीसाठी पाचसदस्यीय समिती नेमली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई निश्चित होणार असे सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या