शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या अंत्यसंस्काराकडेही नातेवाईकांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:28 IST

अंत्यविधीच्या निमित्ताने मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता येते यासाठी सर्व कामे साेडून नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीला उपस्थित राहतात. त्यामुळे ...

अंत्यविधीच्या निमित्ताने मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता येते यासाठी सर्व कामे साेडून नातेवाईक, मित्र परिवार अंत्यविधीला उपस्थित राहतात. त्यामुळे अंत्यविधीला लग्न समारंभाप्रमाणेच गर्दी उसळते. या गर्दीतून इतरही नागरिकांना काेराेनाचा संसर्ग हाेऊ शकताे. त्यामुळे काेराेना मृताचा मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र मृत व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे साेपस्कार पार पाडण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानी दिली जाते. बहुतांश मृतांचे नातेवाईक अंत्यंस्काराला येताताच. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या सहा मृतांच्या नातेवाईकांनी चक्क अंत्यसंस्कारास उपस्थिती दर्शविण्यास नकार दिला. यामागे संबंधित कुटुंबीयांच्या काही अडचणी नक्कीच असतील हे मान्यच करावे लागेल. अंत्यविधीला आम्ही उपस्थित राहू शकत नाही. तुम्हीच अंत्यविधी पार पाडावे असे संमतीपत्र लिहून देताना नातेवाईकांना किती दु:ख झाले असावे हे तेच सांगू शकतात.

बाॅक्स

अशी पार पाडली जाते अंत्यविधीची प्रकिया

काेराेनामुळे मृत्यू झाल्यास याबाबतची माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनामार्फत दिली जाते. अंत्यविधीच्या माध्यमातून इतर नागरिकांमध्ये काेराेनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या हातात दिला जात नाही. मात्र पाच नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. नगर परिषदेच्या शववाहिकेने मृतदेह स्मशान घाटापर्यंत पाेहाेचविल्या जाते. दाेन नातेवाईक पीपीई किट घालून अंत्यविधीचे सर्व साेपस्कार पार पाडतात. नातेवाईक जर अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसतील तर याबाबत त्यांना आराेग्य विभागाकडे तसे लेखी लिहून द्यावे लागते. ही बाब नगर परिषदेला कळविली जाते व नगर परिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. जर नातेवाईकांनी लेखी लिहून न दिल्यास संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवपेटीत ठेवून दाेन ते तीन दिवस नातेवाईकांची प्रतीक्षा केली जाते. त्यानंतरही नातेवाईक न आल्यास रुग्णालय प्रशासन पाेलीस स्टेशन व नगर परिषदेला कळविते. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.