शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी वैरागडवासीयांचे भंडारेश्वराला साकडे

By admin | Updated: August 4, 2015 00:59 IST

गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर

वैरागड : गेल्या २०-२५ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनासाठी आता सारेच जण ईश्वराची करूणा भाकत आहे. याचाच एक भाग म्हणून वैरागडवासीयांनी सोमवारी येथील भंडारेश्वर मंदिरात भजनाच्या निनादात पूजा-अर्चा करून देवाला पावसाच्या आगमनाचे साकडे घातले. दरम्यान वरूणदेवानेही नागरिकांचे आर्त हाक ऐकत कृपादृष्टी दाखविली. परिणामी पाऊस झाल्याने मंदिरात आलेल्या गावकरी ओले होऊन घरी परतले. गेल्या २०-२५ दिवसांपासून वैरागड परिसरासह जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतजमिनीतील धानाचे पऱ्हे करपायला लागले आहेत. तसेच अनेक भागातील रोवणीचे काम खोळंबले आहे. परिणामी पऱ्हे टाकण्यापासून तर आतापर्यंतच्या शेतीमशागतीचा खर्च कसा भरून काढायचा, या विवंचनेत जिल्हाभरातील शेतकरी सापडला आहे. निसर्गाची अवकृपा होत असल्याचे पाहून वैरागड परिसरातील शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले. त्यामुळे आता भंडारेश्वराची करूणा भाकायची, असा निर्धार वैरागडवासीयांनी केला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळपासून वैरागडातील सर्व नागरिक भंडारेश्वर मंदिरात एकत्र जमले. ढोलकी व टाळ, मृदंगाच्या निनादात भजन करून पावसाच्या आगमनाची करूणा भाकण्यात आली. भंडारेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजतापासून ते दुपारी १२ वाजतापर्यंत धार्मिक विधी चालला. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. पदाधिकारी, भंडारेश्वर देवस्थानचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)भंडारेश्वराचा जलाभिषेक; दुकानेही बंदभंडारेश्वर मंदिर परिसरात जमलेल्या पुरूष महिलांनी नजीकच्या खोब्रागडी नदीपात्रातील पाणी आणून भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगाचे जलाभिषेक केले. मनोभावे पूजा-अर्चा करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावा, अशी प्राथना केली.पावसाने दीर्घ कालावधीपासून उसंत घेतल्यामुळे वैरागडसह जिल्हाभरातील शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. शेतीत उत्पादन झाले नाही तर त्याचा इतर व्यवसायावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे वैरागडवासीयांनी सोमवारी नियोजित केलेल्या भंडारेश्वर पूजा-अर्चेच्या कार्यक्रमादरम्यान गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कार्यक्रमात सहभाग दर्शविला.