शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायत आरक्षणाची सोडत

By admin | Updated: August 15, 2015 00:13 IST

जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ....

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, ही सोडत २० व २१ आॅगस्टला होणार आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण गट व महिलांसाठी राखीव ठेवावयाच्या जागा सोडत पध्दतीने निश्चित करण्यात येणार आहेत. कोरची, आरमोरी, धानोरा, चामोर्शी व अहेरी या नगर पंचायतींची सोडत तेथील नगर पंचायत कार्यालयांमध्ये २० आॅगस्टला दुपारी १२ वाजता होणार आहे. आरक्षण सोडत काढण्यासंदर्भात प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरचीकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून एम.डी. टोनगावकर, आरमोरी डी.जी. नान्हे, धानोरा डी.एस.सोनवने, चामोर्शी जी.एम.तळपाडे, अहेरी जे.डी. पाटील या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कुरखेडा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा व सिरोंचा येथील नगर पंचायतीची आरक्षण सोडत २१ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगर पंचायत कार्यालयांमध्ये होणार आहे. कुरखेडाकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून एम.डी. टोनगावकर, भामरागड डी.जी.नान्हे, एटापल्ली डी.एस.सोनवने, मुलचेरा जी.एम.तळपाडे व सिरोंचासाठी जे.डी.पाटील या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता कोरची, चामोर्शी, अहेरी, भामरागड साठी नियंत्रण अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे व जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव यांची सहायक समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती आली आहे.आरमोरी, धानोरा, कुरखेडा, मुलचेरा व एटापल्लीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांची नियंत्रण अधिकारी म्हणून, तर गडचिरोली नगर परिषदचे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांची सहायक समन्वक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)