शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

३१ जुलैपर्यंत मुदत : शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विमा काढला जात असला तरी गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे बहुतांश शेतकरी धानाचाच विमा काढतात. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन विमा काढता येते. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही. जे शेतकरी पीक विमा घेत नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा काढता येतो. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यास पिकाचा विमा निघतो. जिल्हाभरातील २३ हजार ७०० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ३०२ सोयाबीन उत्पादकांना लाभ मागील वर्षी सोयाबीन उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. प्रामुख्याने चामोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. याच तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी विमा काढला होता. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले, अशा ३०२ शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली आहे. खरीप पिकांचा विमा काढण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तलाठी, कृषी सहायक यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पीक विम्याचे महत्त्व पटवून दिले जात असल्याने पीक विमा काढणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.