शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

रेगडीच्या विश्रामगृहाची दुरवस्था कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST

घोट : नजीकच्या रेगडी येथील जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या वतीने विश्रामगृह बांधण्यात आले. दरम्यान, २००६ मध्ये नक्षलवाद्यांनी या ...

घोट : नजीकच्या रेगडी येथील जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या वतीने विश्रामगृह बांधण्यात आले. दरम्यान, २००६ मध्ये नक्षलवाद्यांनी या विश्रामगृहाची जाळपाेळ केली. तेव्हापासून या विश्रामगृहाच्या साेयी-सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी हाेत असली तरी याकडे प्रशासनाने कानाडाेळा केला आहे.

जलसंपदा विभाग नागपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर व सिंचन उपविभाग चामोर्शी शाखा घोटच्या अंतर्गत येत असलेल्या रेगडी येथे सन १९७३ ते १९७४ साली विश्रामगृह बांधण्यात आलेले होते. दरम्यान, सन २००६ मध्ये नक्षलवाद्यांकडून या विश्रामगृहाची जाळपोळ करण्यात आली होती. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हे जिल्हातील एकमेव मोठे जलाशय आहे. तसेच या जलाशयावर वनविभागाने वनाेद्यान उभारलेले आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक दरराेज येतात. परंतु, पर्यटकांना विश्राम करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे जुने विश्रामगृह दुरुस्ती करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.