शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित २३ लाख इतरत्र वळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2016 01:29 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला जि.प.च्या जिल्हा निधी व वनमहसूल योजनेतून प्राप्त झालेला तब्बल २३ लाख ५० हजार रूपयांचा निधी अखर्चित राहिला.

२९ टक्के निधी : पशुसंवर्धन विभागाचा निधी जिल्हा परिषदेने बांधकामावर पळविलादिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला जि.प.च्या जिल्हा निधी व वनमहसूल योजनेतून प्राप्त झालेला तब्बल २३ लाख ५० हजार रूपयांचा निधी अखर्चित राहिला. हा निधी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने बांधकाम विभागाकडे वळता केल्याची विश्वसनीय माहिती लोकमतला मिळाली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या कामावर परिणाम झाला. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला जिल्हा निधी व वन महसूल योजनेंतर्गत पशुपालकांच्या विविध योजनांवर खर्च करण्यासाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ८१ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी पशुसंवर्धन विभागाने ५७ लाख ४९ हजार ९५९ रूपयांचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ७१ आहे. उर्वरित २९ टक्के म्हणजे, २३ लाख ५० हजार ४१ रूपयांचा अखर्चीत निधी जि.प.च्या बांधकाम विभागाकडे मार्च २०१६ अखेर वळविण्यात आला. जि.प. च्या पशुसंवर्धन विभागाला जिल्हा निधी योजनेंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकूण ११ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी जिल्हाभरात जनावरांचे कृती शिबिर आयोजित करण्यासाठी २ लाख ४९ हजार ९९६ रूपयांचा निधी खर्च झाला. या योजनेतून ८ लाख ५० हजार रूपये अखर्चीत राहिले. वन महसूल योजनेंतर्गत जि.प.च्या पशु संवर्धन विभागाला मागील आर्थिक वर्षात एकूण ७० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. पशुसंवर्धन विभागाने यापैकी ५४ लाख ९९ हजार ९६३ रूपयांचा निधी खर्च केला. या योजनेतून प्राप्त झालेला एकूण १५ लाख ३७ रूपयांचा निधी अखर्चीत राहिला. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात पशुपालक शेतकऱ्यांसाठी हायड्रोफोनिक्स तंत्राने हिरव्या चाऱ्याची लागवड करणे तसेच ५० टक्के अनुदानावर कुक्कुट पालनाकरिता लोखंडी पिंजरे वाटप करणे या दोन नव्या योजना कार्यान्वित केल्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जि.प.च्या सन २०१५-१६ च्या वार्षिक अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाला तरतुदीप्रमाणे निधी प्राप्तही झाला. मात्र जिल्ह्यातील पशुपालक लाभार्थ्यांकडून या दोन नव्या योजनांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने या योजनेवरील निधी अखर्चीत राहिला, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे.याबाबीवर शून्य टक्के खर्चजिल्हा निधी योजनेंतर्गत पिसाळलेले कुत्रे पाळीव जनावरांना चावा घेतल्यानंतर संबंधित जनावरांना रोग प्रतिबंधक लस टोचणे याबाबीसाठी ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. तसेच वन महसूल योजनेंतर्गत हायड्रोफोनिक्स तंत्राने हिरवा चारा लागवडीसाठी पशुसंवर्धन विभागाला तरतुदीनुसार १० लाख प्राप्त झाले.क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थांना औषध पुरवठा करण्यासाठी पाच लाख रूपयांची तरतूद असून तेवढा निधी प्राप्त झाला. ५० टक्के अनुदानावर पशुपालकांना वैरण बियाणे पुरविण्यासाठी तरतुदीनुसार ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र या तिन्ही बाबीवर जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने एकही रूपयाचा निधी खर्च केला नाही. महिला आर्थिक विकास महामंडळाने सुचित केल्यानुसार जि.प. पशुसंवर्धन विभागामार्फत हायड्रोफोनिक्स तंत्राने हिरव्या चाऱ्याची लागवड करणे तसेच कुक्कुट पालनाकरिता ५० टक्के अनुदानावर लोखंडी पिंजरे वाटप करणे या दोन नव्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या. मात्र सदर दोन्ही योजनेला जिल्ह्यातील पशुपालकांचा प्रतिसाद न मिळाल्याने या बाबींवरील निधी अखर्चीत राहिला. सदर निधी वळता करण्यात आला.- डॉ. गिरीष रामटेके, पशुधन विकास अधिकारी, जि.प. पशुसंवर्धन विभाग