शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १५ लाखांचा कर वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:25 IST

नगर परिषदेने थकीत मालमत्ता करधारकांविरोधात मंगळवारपासून जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचा धसका घेत शासकीय कार्यालये व खासगी नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देएसपी कार्यालयाने भरले ९ लाख ९० हजार : गडचिरोली नगर परिषदेची धडक मोहीम सुरू

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : नगर परिषदेने थकीत मालमत्ता करधारकांविरोधात मंगळवारपासून जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईचा धसका घेत शासकीय कार्यालये व खासगी नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी एकाच दिवशी सुमारे १५ लाख रूपयांची कर वसुली करण्यात आली आहे.नगर परिषदेच्या जप्ती व वसुली पथकाने बुधवारी शिक्षक कॉलनी, चनकाई नगर, महिला महाविद्यालयाचा परिसर, कारिगल चौक व कॉम्प्लेक्स परिसरात वसुलीची मोहीम राबविली. खासगी व्यक्तींकडून जवळपास तीन लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. शिक्षक कॉलनीतील दोन नागरिकांची दोन दुचाकी वाहने जप्त केली आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुमारे ९ लाख ९० हजार रूपयांचा कर थकला होता. बुधवारी या कार्यालयाने कराचा भरणा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख ५१ हजार रूपये व महिला महाविद्यालयाने ५० हजार रूपयांचा कर भरला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा प्रशिक्षण कार्यालयाकडे सुमारे १ लाख ९ हजार रूपयांचा कर थकला आहे. या कार्यालयावरही कारवाई करण्यासाठी वसुली पथक गेले असता, एक ते दोन दिवसात धनादेश उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रशिक्षण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी दिले. त्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली.गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई केली जात आहे. यापूर्वी केवळ वसुली पथकाचे कर्मचारी घरोघरी फिरून कर वसूल करीत होते. मात्र नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याचा भ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. परिणामी वेळोवेळी नोटीस बजावूनही कराचा भरणा करीत नव्हते. जप्तीची कारवाईनंतर मात्र थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई आणखी १५ दिवस चालणार आहे. ज्यांच्याकडे जास्त वर्षांपासून कर थकीत आहे, अशांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कर निरीक्षक चंद्रशेखर पुण्यपवार यांनी दिली.

टॅग्स :Taxकर