शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत ५५ लाखांचा करमणूक कर वसूल

By admin | Updated: December 27, 2014 22:50 IST

जिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५४ लाख ८८ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील केबल आॅपरेटर, डीटीएच व इतर करमणुकीच्या माध्यमातून एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५४ लाख ८८ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला २०१४-१५ या आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांचा करमणूक कर गोळा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ केबल आॅपरेटर व १३ हजार ५२१ केबल ग्राहक आहेत. केबल ग्राहकांकडून ९ महिन्यांत २१ लाख ६० हजार रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. नगर परिषद क्षेत्रात येत असलेल्या केबल ग्राहकांवर ३० रूपये तर ग्रामीण भागातील केबल ग्राहकांवर शासन १५ रूपये करमणूक कर आकारते. केबलच्या तुलनेत डीटीएच लावल्याने टीव्ही चांगली दिसते. त्याचबरोबर संपूर्ण चॅनेल डीटीएचवर बघायला मिळतात. त्याचबरोबर केबल तुटल्याचीही तक्रार राहत नाही. त्यामुळे ग्राहक डीटीएचकडे वळत चालला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २० हजार ६७४ डीटीएच आहेत. या डीटीएचच्या माध्यमातून ३२ लाख ९ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. डीटीएच रिचार्ज मोबाईलच्या माध्यमातून मारले जातात. त्यामुळे याबाबतची नोंद मुंबई येथील कार्यालयात होते व त्याची एक प्रत जिल्हास्तरावरील कार्यालयाला पाठविले जातात. ध्वनीक्षेपक व मिनाबाजार तसेच इतर माध्यमातून ९३ हजार रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. एक महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे चित्रपटगृह सुरू झाले असून या चित्रपटगृहाच्या माध्यमातून २० हजार रूपये महसूल मिळाला आहे. असा एकूण ९ महिन्यांत ५४ लाख ८८ हजार रूपयांचा महसूल गडचिरोली करमणूक विभागाने गोळा केला आहे. (नगर प्रतिनिधी)