शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

४० लाख वसूल

By admin | Updated: December 29, 2014 01:25 IST

जिल्हा व तालुका महसूल विभागाने अवैध गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांकडून १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंत ...

दिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा व तालुका महसूल विभागाने अवैध गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांकडून १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरपर्यंत ९ महिन्याच्या कालावधीत ४५४ प्रकरणातून ४० लाख २५ हजार २५१ रूपये दंड वसूल केला. यामुळे जिल्ह्यातील रेती व अन्य गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने गतवर्षी २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण ७० घाटांना पर्यावरण विभागाच्या मान्यतेनंतर मंजुरी प्रदान केली होती. ई-निविदा प्रक्रिया पार पाडून रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात ८७ पैकी ३१ रेती घाटांची विक्री झाली. जाचक अटीमुळे रेती कंत्राटदारांनी रेती घाटांकडे पाठ फिरविली होती. यामुळे चोरट्या मार्गाने रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाराही तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी आदी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षभर रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबविले. यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाला दंडाच्या रूपात ४५४ प्रकरणातून ९ महिन्यांच्या कालावधीत ४० लाख २५ हजार २५१ रूपयाचा महसूल मिळाला. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६ महसूल विभाग असून यात बारा तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व उपविभागातील रेती व अन्य गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तस्करांवर करडी नजर ठेवून या अवैध मार्गाला आळा घालण्याचे काम महसूल अधिकारी व कर्मचारी करतात. १ एप्रिल ते सप्टेंबर २०१४ अखेरपर्यंतच्या ८ महिन्यांच्या कालावधीत सहाही उपविभागात महसूल अधिकाऱ्यांनी एकूण ३७५ धाडी घातल्या. यात सर्वाधिक गडचिरोली तालुक्यात १०३ त्या खालोखाल देसाईगंज तालुक्यात ५९, अहेरी तालुक्यात ५२, धानोरा तालुक्यात ४९, आरमोरी तालुक्यात २० धाडी टाकून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई केली.