शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी मिळाली, टॉवरचा पत्ता नाही

By admin | Updated: July 17, 2017 01:02 IST

अहेरी तालुक्यातील तिमरन ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गुड्डीगुडम या ठिकाणी केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी मोबाईल टॉवर मंजूर केले आहे.

निर्मितीकडे बीएसएनएलचे दुर्लक्ष : गुड्डीगुडम येथे सहा महिन्यांपासून टॉवर मंजूरलोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील तिमरन ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गुड्डीगुडम या ठिकाणी केंद्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी मोबाईल टॉवर मंजूर केले आहे. मात्र अजूनपर्यंत या ठिकाणी टॉवरचे बांधकाम करण्यात आले नाही. गुड्डीगुडम हा परिसर अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात येतो. या भागात दळणवळणाच्या सुविधांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९० टॉवर निर्मितीच्या कामाला मंजुरी दिली. त्यानंतर लगेच बीएसएनएलकडे निधी सुध्दा उपलब्ध झाला. या ९० टॉवरमध्ये गुड्डीगुडम येथील मोबाईल टॉवरचाही समावेश आहे. मंजुरी मिळल्यानंतर गुड्डीगुडम येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सहा महिने उलटूनही बांधकाम होत नसल्याने नागरिकांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. याकडे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. गुड्डीगुडम येथे ग्रामपंचायत कार्यालय, वनोपज तपासणी नाका, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक आश्रमशाळा, तलाठी कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयांसाठी इंटरनेट व मोबाईलची सुविधा असणे आवश्यक आहे. शाळेमध्ये आता डिजिटल साधनेही आले आहेत. या साधनांचा वापर होण्यासाठी इंटरनेट कनेक्टीव्हिटी अत्यंत गरजेचीे आहे. त्यामुळे टॉवरचे बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी आहे.