शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सौरकृषीपंपासाठी १२१ अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:21 IST

शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते.

ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच : अनुदानावर उपलब्ध होणार सौरकृषीपंप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते. सहा तालुक्यातील ४३० शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. १२१ अर्ज प्राप्त झाले आहेत.सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांला अत्यंत कमी किंमतीत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जात होता. मात्र अनेक पंपांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे वाढल्या होत्या. योग्य दाबाचा वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र डीपी बसवून देण्याचा निर्णय शासनाने सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. डीपी बसविण्यासाठी अडीच लाखांपेक्षा अधिक खर्च येत होता. डीपी बसविल्यावर शेतकऱ्याला वीज बिल भरावे लागत होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौरकृषीपंप देण्याचे धोरण अवलंबिले आहे. सौरकृषीपंपासाठी सुध्दा जवळपास अडीच ते तीन लाख रूपयांचा खर्च येणार आहे. जवळपास पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा वगळता उर्वरित खर्च शासन करणार आहे. सौरकृषीपंपासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात एकाच दिवशी शुक्रवारी जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेतकºयांनी अर्ज कसा करावा, त्यासाठी आवश्यक असलेले दाखले व सौरकृषीपंपाचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.गडचिरोली विभागात कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, कोरची या सहा तालुक्यांमध्ये शिबिर घेण्यात आले. या शिबिरांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गडचिरोली येथील शिबिराला २५ शेतकरी उपस्थित होते. त्यापैकी १२ अर्ज प्राप्त झाले. आरमोरी येथे ८४ शेतकरी उपस्थित होते. २० अर्ज प्राप्त झाले. देसाईगंज येथे २० शेतकरी उपस्थित होते. १३ अर्ज प्राप्त झाले. कुरखेडा येथे १५० शेतकरी उपस्थित होते. ७२ अर्ज प्राप्त झाले. धानोरात १२३ शेतकरी उपस्थित होते. २० अर्ज प्राप्त झाले. कोरचीत २८ शेतकरी उपस्थित होते. चार अर्ज प्राप्त झाले. असे एकूण सहा तालुक्यांमध्ये ४३० शेतकरी उपस्थित होते. एकूण १२१ अर्ज प्राप्त झाले.गडचिरोली जिल्ह्यातील गावांपर्यंत वीज पुरवठा झाला आहे. मात्र शेतांमध्ये स्वतंत्र वीज लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे शेत गावापासून चार ते पाच किमी अंतरावर असल्यास त्याला वीज पुरवठा करण्यास अधिकचा खर्च येईल. त्यामुळे त्याला वीज जोडणी मिळण्यास निश्चितच विलंब होईल. सौरकृषीपंपाला वीज जोडणीची गरज नाही. त्यामुळे लाभार्थ्याला सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप दिल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.विजेवरील पंपापेक्षा सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. या पंपाचे बिल भरण्याची आवश्यकता राहत नाही. अर्जासोबत शेतकऱ्यांना सातबारा, जातीचा दाखला, पाणी सुविधा असल्याची सोय आदी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता कार्यालयात अर्ज करावा.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, वीज विभाग गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती