शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीत पुन्हा बांधली पाळ

By admin | Updated: June 24, 2017 01:22 IST

वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने मागील तीन दिवसांपासून गडचिरोली शहरात अपुरा पाणीपुरवठा होत होता.

पुरेसा पाणीपुरवठा होणार : आठ दिवसांपूर्वीच बंधारा गेला वाहून लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने मागील तीन दिवसांपासून गडचिरोली शहरात अपुरा पाणीपुरवठा होत होता. नगर परिषदेने शुक्रवारी नदीपात्रात पोकलँड मशिनच्या साह्याने पाळ तयार केली. त्यामुळे आता पूर्ववत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. मार्च महिन्यात नदीची पातळी खालावली होती. त्यामुळे नगर परिषदेने जॉकवेलजवळ पोकलँड मशीनच्या सहाय्याने मार्च महिन्यातच बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे जॉकवेलला पुरेसे पाणी उपलब्ध होत होते. ८ दिवसांपूर्वी गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बांधण्यात आलेला बंधारा वाहून गेला. परिणामी जॅकवेल पुन्हा उघड्यावर पडली. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून जॅकवेलमध्ये पुरेसे पाणी जमा होत नसल्याने शहरालाही अपुरा पाणीपुरवठा होत होता. ही बाब नगराध्यक्ष योगीता पिपरे व पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या लक्षात येताच त्यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांसह वैनगंगा नदीतील पाणी पातळीची पाहणी केली. त्याचबरोबर शुक्रवारी पोकलँड मशिनच्या सहाय्याने बंधारा बांधला. आता पुरेशा प्रमाणात पाणी जॅकवेलजवळ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल, अशी अशा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी शरद सोनटक्के, बंडू काळे, सुरेश जुआरे, माजी नगरसेवक अजय बारसागडे, उमेश बारसागडे, रमेश बारसागडे उपस्थित होते. पाण्याचा काटकसरीने वापर करा दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. प्रत्येक नळधारकांनी नळांना टोट्या लावाव्या, टिल्लू पंपाचा वापर टाळावा, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे व पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांनी केले आहे.