शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटांचा लिलाव पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:15 IST

रेतीघाटांचे लिलाव करण्यासंबंधी नवीन अटी लावल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरिय समितीकडे पाठविलेल्या प्रस्तावात पुन्हा त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रेतीघाटांचे लिलाव पुन्हा लांबणीवर पडणार आहे. प्रत्यक्ष रेती उपलब्ध होण्यास किमान दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शासन व प्रशासनाच्या जाचक अटींचा फटका बांधकाम व्यवसायाला बसणार आहे.

ठळक मुद्देजाचक अटी : राज्यस्तरीय समितीने काढल्या त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेतीघाटांचे लिलाव करण्यासंबंधी नवीन अटी लावल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्यस्तरिय समितीकडे पाठविलेल्या प्रस्तावात पुन्हा त्रुटी काढण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या रेतीघाटांचे लिलाव पुन्हा लांबणीवर पडणार आहे. प्रत्यक्ष रेती उपलब्ध होण्यास किमान दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शासन व प्रशासनाच्या जाचक अटींचा फटका बांधकाम व्यवसायाला बसणार आहे.ज्या रेतीघाटांमधून रेतीचा उपसा केला जातो, अशा रेती घाटाला पर्यावरणविषयक परवानगी मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी ही परवानगी जिल्हास्तरीय समिती देत होती. मात्र यावर्षी पहिल्यांदाच राज्यस्तरीय समितीकडून परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले. विशेष म्हणजे हा निर्णय सप्टेंबर महिन्यातच घेणे आवश्यक असताना शासनाने हा निर्णय डिसेंबर महिन्यात घेतला. त्यामुळे ज्या रेती घाटांना जिल्हास्तरीय समितीने परवानगी दिली, तेच रेतीघाट पुन्हा राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात आले. १५ दिवसांपूर्वी या समितीने सहा त्रुटी काढल्या. या त्रुट्या दूर करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म विभागाला दिले.मात्र अजूनपर्यंत हा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रस्ताव सादर केला तरी राज्यस्तरीय समिती या प्रस्तावावर निर्णय घेण्यास किमान आठ दिवस लावेल. यामध्ये फेब्रुवारी अर्धा महिना संपेल.परवानगी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया जवळपास १५ ते २० दिवस चालते. कंत्राटदाराने लिलावात घाट घेतल्यानंतर त्याने लिलावाचे पैसे भरणे त्याला रेती घाट मापून देणे. यासाठी पुन्हा ८ ते १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच एकंदरीत प्रशासनाने कितीही घाई केली तरी प्रत्यक्ष रेतीघाट सुरू होण्यास एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे.बांधकाम व्यवसाय मंदावलामागील दोन महिन्यांपासून रेती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. चोरीची रेती चार हजार रूपये ब्रास दराने विकली जात आहे. एवढा मोठा भाव देऊन रेती खरेदी करणे अनेकांना शक्य नसल्याने त्यांनी बांधकामच बंद ठेवले आहेत. तर काही नागरिक चोरीची रेती खरेदी करून बांधकामे करीत आहेत. पुन्हा दीड महिना रेती न मिळाल्यास बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम पडणार आहे. रेतीघाटांचा लिलाव करण्यासाठी शासनाकडून अनावश्यक विलंब केला जात आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी होत आहे.