शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दोन सभापतींची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:45 IST

जिल्ह्यातील नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली.

ठळक मुद्देविषय समितीची निवडणूक : सिरोंचा व भामरागड न. पं. मध्ये प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा/भामरागड : जिल्ह्यातील नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली.सिरोंचा नगर पंचायतीत विषय समिती सभापती पदाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. बांधकाम समिती सभापतीपदी सीमा रामस्वामी मासर्ला, पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी तोकला विजयकुमार तुलसीराम यांची फेरनिवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी वनिता रालबंडीवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, तिन्ही पदाकरिता अनुक्रमे एकेक अर्ज प्राप्त झाले होते. दोन सभापती पद भाजपकडे तर एक सभापतीपद राष्टÑवादी काँग्रेसकडे कायम आहे. दोन स्वीकृत सदस्य व १७ निर्वाचित सदस्य असे एकूण १९ सदस्य संख्या नगर पंचायतीची आहे. विशेष समिती सभापती निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी भरत नंदनवार यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार रमेश जसवंत उपस्थित होते.भामरागड येथे स्थायी समितीचे गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष राजू वड्डे तर सदस्यपदी बांधकाम सभापती हरिदास रापेल्लीवार, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती शंकर आत्राम, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी शारदा कंबगौणीवार, महिला व बालकल्याण सभापती कविता सिडाम, महिला व बालकल्याण उपसभापती बेबी पोरतेट यांची निवड करण्यात आली. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार कैलास अंडिल, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी काम पाहिले. याप्रसंगी अधिकारी हजर होते.