शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

रेपनपल्लीत चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:09 IST

कमलापूर परिसरातील गावांच्या विकासासाठी निधी द्यावा, त्याचबरोबर नागरिकांच्या सामान्य समस्या सोडवाव्या, या मागण्यांसाठी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी,

ठळक मुद्दे शेकडो नागरिकांचा सहभाग : कमलापूर परिसरातील गावांचा विकास करा

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : कमलापूर परिसरातील गावांच्या विकासासाठी निधी द्यावा, त्याचबरोबर नागरिकांच्या सामान्य समस्या सोडवाव्या, या मागण्यांसाठी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी, अहेरीच्या सभापती सुरेखा आलाम यांच्या नेतृत्वात रेपनपल्ली येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन केले.अहेरी उपविभागातील आदिवासी व गैरआदिवासी अतिक्रमणधारकांचे दावे स्वीकारून त्यांना कायमस्वरूपी पट्टे वितरित करावे, कमलापूर येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे, राजाराम व कमलापूर येथे राष्टÑीयकृत बँकेची स्थापना करावी, कमलापूर येथे ३३ केव्ही वीज स्टेशन स्थापन करावे, निराधार व वृद्धापकाळ लाभार्थ्यांचे अनुदान ६०० वरून १५० रूपये द्यावे, चंद्रपूर, गडचिरोलीची बससेवा राजाराममार्गे न्यावी, रेगुलवाही, अंबेझरा, कोलामारका अभयारण्य निर्माण करू नये, अहेरी-आलापल्ली-सिरोंचा रस्ता तत्काळ दुरूस्त करावा, कमलापूर येथे पशुवैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करावी, छल्लेवाडा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली भारतातील पहिली आश्रमशाळा शासनाद्वारे चालवावी आदी मागण्यांसाठी रेपनपल्ली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून कमलापूर भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागाचा विकास करावा, याकरिता परिसरातील नागरिकांच्या वतीने अनेकदा शासन, प्रशासनाला निवेदने देण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले.आंदोलन सुरू झाल्यानंतर माजी आ. दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हा निमंत्रक विजय खरवडे, अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे भास्कर तलांडे आदींनी आंदोलनस्थळाला भेट दिली. उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून पाठिंबा दर्शविला.आंदोलनात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोेलन करण्याचा इशारा दिला. तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही. बडगू, अहेरीचे आगारप्रमुख वाय.एम. राठोड, वाहतूक नियंत्रक जे.सी. राजवैद्य, वनपरिक्षेत्राधिकारी जे.एम. लांडगे, कमलापूरचे तलाठी सचिन मडावी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.