आरोपीला चार दिवसांचा पीसीआरएटापल्ली : गावातीलच एका महिलेवर दुकानदार असलेल्या इसमाने बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील परसलगोंदी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने या आरोपीला ३० नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुलसा कल्ले मट्टामी (४०) रा. परसलगोंदी असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दुलसा कल्ले मट्टामी याच्याकडे एक ट्रॅक्टर व एक सुमो वाहन असून तो आटाचक्कीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे किराणा दुकानही आहे. सदर प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर अनेक दिवस मट्टामी याने आपले शारीरिक शोषण केले. त्यांनी मला पत्नी म्हणून स्वीकार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही दोघे जण गावाबाहेर पडून गेलो. कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर गावात गावपंचायतीची बैठक झाली. यात दुलसा मट्टामी याचेकडून ५० हजार रूपये दंडाची आकारणी करण्यात आली. त्यानंतर मी माझ्या पतीसोबत राहू लागली. पुन्हा दुलसाने आपले शारीरिक शोषण करणे सुरू केले. त्यानंतर एक दिवस दुलसाने मला बळजबरीने पळवून नेले. दरम्यान पुलावर एकटीला सोडून तो पसार झाला. मी घाबरलेल्या अवस्थेत कशीबशी एटापल्लीला गेलो. त्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार माझी मावस बहिण व गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर आपण २४ नोव्हेंबर मंगळवारला हेडरी पोलीस मदत केंद्र गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून हेडरी पोलिसांनी गुरूवारी आरोपी दुलसा मट्टामी याचे विरोधात भादंविचे कलम ३७६, ३६६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला व आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अहेरीच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले. न्यायालयाने आरोपी दुलसा मट्टामी याला ३० नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एटापल्लीचे प्रभारी ठाणेदार उपेंद्र देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरी पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)चाकूचा धाक दाखविलामट्टामी यांच्याकडे आपला मुलगा वाहनचालक म्हणून तर पती किराणा दुकानात कामाला आहेत. काही दिवसानंतर दुलसा मट्टामी याने कामाचा व्याप वाढवून माझ्या पतीला दुकानात रात्री १२ वाजेपर्यंत राहण्याची सक्ती केली. दरम्यान एक दिवस रात्री १० वाजताच्या सुमारास मी एकटीच घरी असताना घरात प्रवेश केला. नशेत असलेल्या मट्टामी याच्या हातात चाकू होता. त्याने मला व माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्यावर बलात्कार केला.
परसलगोंदीत विवाहित महिलेवर बलात्कार
By admin | Updated: November 28, 2015 02:31 IST