शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्यास सश्रम कारावास

By admin | Updated: June 8, 2017 01:41 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने भादंविचे कलम ३७६, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार

न्यायालयाचा निकाल : व्हिडिओ क्लिप तयार करून ब्लॅकमेल्ािंग लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने भादंविचे कलम ३७६, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व सात हजार रूपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. संजय सुखदेवे (३०) रा. देसाईगंज असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेची हकीकत याप्रमाणे आहे की, आरोपी संजय सुखदेव याने आपल्या मित्राकडून अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर घेतला. अल्पवयीन मुलीला तिच्या घराजवळ सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बोलाविला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. अल्पवयीन मुलीने नकार दिल्यावर संजयने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित अल्पवयीन मुलगी संजयच्या तावडीतून सुटून पळून गेली. त्यानंतर काही दिवसांनी मला माफी मागायची आहे, तू अंकलच्या घरी ये, असे म्हणून संजयने पीडित मुलीला बोलाविले. अंकल याच्या घरी वरच्या मजल्यावर तिला बोलावून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान याचवेळी संजयने व्हिडीओ क्लिप तयार केली. यानंतर त्याने व्हिडीओ क्लिप तयार केल्याचे तिला सांगून मी जेव्हा तुला बोलाविणार, तेव्हा-तेव्हा त्या-त्या ठिकाणी यावे लागेल, न आल्यास सदर व्हिडीओ क्लिप इंटरनेटवर अपलोड करेल. तसेच तुझ्या कुटुंबियांना ही व्हिडीओ क्लिप दाखविणार, अशी धमकी मुलीला संजयने दिली. काही दिवसानंतर त्याने २० हजार रूपयांची मागणी मुलीकडे केली. त्यानंतर पीडित मुलीने देसाईगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून संजयविरूद्ध भादंविचे कलम ३७६, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला डिसेंबर २०१५ मध्ये अटक केली. पीएसआय सतीश सोनेकर यांनी या प्रकरणाचा तपास करून हे प्रकरण न्यायालयात वर्ग केले. जिल्हा न्यायाधीश यू.एम. पदवाड यांनी सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षपुरावे तपासून आरोपी संजय सुखदेवे याला भादंविचे कलम ३७६ अन्वये १० वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंड तसेच कलम ३८७ अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास, एक हजार रूपये दंड, बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत एक वर्ष कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अनिल प्रधान, सहायक सरकारी वकील एस. यू. कुंभारे यांनी काम पाहिले.